मुख्यपृष्ठ / पाककृती / करंजी

Photo of Karanji by Pranali Deshmukh at BetterButter
0
2
0(0)
0

करंजी

Aug-17-2018
Pranali Deshmukh
25 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

करंजी कृती बद्दल

उपवासाला पोटभर काहीतरी हेल्दी कमी तेलात करायचं असेल तर उपवासाची करंजी करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. राजगिरा पीठ 1 कप
  2. वरई पीठ 1/4 कप
  3. साबुदाणा पीठ 2 tbs
  4. 1/4 कप साजूक तुप मोहन
  5. बटाटे 2
  6. ओला नारळ किसून 1/4 कप
  7. शेंगदाणे कुट जाडसर 2 tbs
  8. जिरे 1 tbs
  9. मिरपूड 1/2 tbs
  10. हिरवी मिरची 2 चिरून
  11. तेल किंवा तूप 1 tbs
  12. मीठ
  13. साखर 1 tbs
  14. लिंबाचा रस 1 tbs

सूचना

  1. एका बाउल मध्ये सर्व पिठ घ्या त्यामध्ये मीठ आणि तूप घालून छान मिक्स करा पाणी घालून पीठ मळून घ्या आणि 10 मिनिट झाकून ठेवा.
  2. बटाटे सोलून किसून घ्या पाण्यात टाकून ठेवा.
  3. कढईत 1 tbs तेल किंवा तूप घाला
  4. तेल तापले कि जिरे मिरची घाला
  5. बटाट्याचा किस पिळून घाला
  6. वरून मिरपूड मीठ शेंगदाणे कूट आणि खोबरे घालून मिक्स करा.
  7. साखर आणि लिंबाचा रस घालून झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्या आणि थंड करा.
  8. आता पीठ मळून घ्या हाताला थोडं तूप लावून मळून घ्या
  9. छोटी गोळी घेऊन अलगद लाटा आणि करंजीच्या साच्यात ठेवा.
  10. वरून दोन्ही बाजूला चमच्याने बटाट्याची भाजी ठेवा
  11. साच्या बंद करून बाहेरील जास्तीचा भाग काढून घ्या.
  12. सर्व करंज्या याच प्रकारे करा वरून ब्रशनी तूप लावा.
  13. मायक्रोवेव्ह प्रीहीट करून 160°ला 10 मिनिट बेक करा
  14. जर बेक नसेल करायची तर सरळ तेलात किंवा तुपात तळून घ्या.
  15. खुसखुशीत करंजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर