BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची फ्रुट पाणीपुरी

Photo of Fasting fruit pani puri by Seema jambhule at BetterButter
0
9
0(0)
0

उपवासाची फ्रुट पाणीपुरी

Aug-17-2018
Seema jambhule
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची फ्रुट पाणीपुरी कृती बद्दल

कधी कधी उपावास असला तरी पाणीपुरी खायची इच्छा होते.. त्या मुळे मी उपवासाची फ्रूट पाणीपुरी बनवली त्यामुळे आता उपावास असला तरी पाणीपुरी खायचा आनंद घेता येईल.. सोपी आणि झटपट अशी उपवासाची पाणीपुरी...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिंगाड्याचे पीठ 1 वाटी
  2. बेकिंग सोडा चिमूटभर
  3. उपवासाचे मीठ चवीनुसार
  4. तेल
  5. डाळिंबाचे दाणे 1 वाटी
  6. हिरवी मिर्ची पाव तुकडा
  7. अद्र्क पाव तुकडा
  8. काळ मीठ छोटा पाव चमचा
  9. पुदिनाची पाने 3-4
  10. साखर 1/2 चमचा
  11. जिरे पावडर छोटा पाव चमचा
  12. लिंबू रस 1 1/2 चमचा

सूचना

  1. सर्वात प्रथम पाणीपुरीचे पाणी तयार करणे साठी एक वाटी डाळिंबाचे दाणे घ्या
  2. त्यात पुदिनाचे पान , हिरवी मिर्चीचा आणि अद्र्कचा तुकडे , चवीनुसार काळ मीठ उपवासाचे मीठआणि लिंबू रस आणि जिरे पावडर टाका आणि मिक्सर ला लावुन वाटून घ्या
  3. आता वाटलेला मिश्रणात पाणी टाका व गळून घ्या
  4. त्यात चवीनुसार साखर टाकून मिक्स करा
  5. आता पुरी साठी शिंगाड्याचे पीठ घ्या
  6. त्या पिठात उपवासाचे मीठ , बेकिंग सोडा व तेल टाकून पीठ पाणी टाकून मळून व 10 मिनट बाजूला ठेवा
  7. आता माळेला पिठाचा गोळा बनवून हलके हाताने पोळी लाटून घ्या व त्याचे गोल पुरी कुकीज कटर ने कापून घ्या
  8. आता तेल गरम करा व गरम तेलात पुरी तळून घ्या... पुरी तळताना त्यावर तेल उडवत राहा म्हणाजे पुरी फुलून येते..
  9. आता सर्व पुरी तळून घ्या
  10. आता तुमचा आवडी नुसार फळे घ्या व त्याचे बारीक तुकडे करा आणि पाणीपुरी सोबत खायला द्या...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर