उपवास इडली | Fast idli Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  17th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fast idli recipe in Marathi,उपवास इडली, Teju Auti
उपवास इडलीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

उपवास इडली recipe

उपवास इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fast idli Recipe in Marathi )

 • १ वाटी वरी तांदूळ
 • २ वाटया पाणी
 • मीठ
 • इडलीचे पात्र व तेल

उपवास इडली | How to make Fast idli Recipe in Marathi

 1. एका मध्यम आकाराच्या टोपात पाणी उकळत ठेवावे. वरीचे तांदूळ धुउन घ्यावेत. पाणी उकळल्यावर त्यात धुतलेले तांदूळ घालावेत व त्यात चवीनुसार मीठ घालावे.
 2. २-३ उकळी आल्यावर गॅस बंद करावा. तयार झालेले मिश्रण चमच्याने टाकण्याइतपत घटट झाले की इडलीपात्राला तेल लावून ते मिश्रण त्यात घालावे.
 3. १० मिनीटे इडली वाफवून घ्यावीत व साधारण थंड झाल्यावर काढून घ्यावीत.

My Tip:

एकावेळी एकाच वाटीचे मिश्रण तयार करावे. जास्त केल्यास ते मिश्रण घटट होते त्यामुळे ते इडलीपात्रात घालता येत नाही.

Reviews for Fast idli Recipe in Marathi (0)