उपवासाची मीठी कचोरी | Sweet Kachori Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  18th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet Kachori recipe in Marathi,उपवासाची मीठी कचोरी, Bharti Kharote
उपवासाची मीठी कचोरीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

उपवासाची मीठी कचोरी recipe

उपवासाची मीठी कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Kachori Recipe in Marathi )

 • दोन मध्यम आकाराचे ऊकडलेले बटाटे
 • अर्धी वाटी वरईच पीठ
 • सारणासाठी
 • अर्धी वाटी खवा
 • पाव वाटी ओले खोबरे खिसून
 • दोन चमचे मिक्स ड्रायफ्रूटस
 • पाव चमचा वेलची पूड
 • अर्धी वाटी पीठी साखर

उपवासाची मीठी कचोरी | How to make Sweet Kachori Recipe in Marathi

 1. बटाटा कुसकरून घ्या त्यात वरईच पीठ घालून मिक्स करा.
 2. मिक्स करून एकजीव होईपर्यंत मळून घ्या. .
 3. 10 मी.बाजूला ठेवा. .
 4. सारणासाठी. ....खवा मंद आचेवर परतून घ्या. .
 5. त्यात खोबरे खीस पीठी साखर घालून एकत्र करा. .गॅस बंद करा
 6. एका डीश मधे मिश्रण काढून घ्या.
 7. त्यात सर्व ड्रायफ्रूटस घाला.वेलची पूड घाला. .
 8. मिक्स करून घ्या. .
 9. आता बाजूला ठेवलेल्या गोळ्या च्या पारी करून घ्या. .त्यात सारण भरा..
 10. आणि गोल कचोरी बनवा. .
 11. आता गॅस वर पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
 12. त्यात एक एक कचोरी हळूच सोडा. .
 13. मंद आचेवर हळूवार तळून घ्या.
 14. गुलाबी रंग आला की छान तळले असं समजाव
 15. खमंग तळून घ्या.
 16. अशाच सर्व कचोरी तळून घ्या.
 17. गरमागरम कचोरी सर्व्ह करा. .हया कचोरया तशाच खायला खूप छान लागतात..

My Tip:

यांत वरई ऐवजी शिंगाडा पीठ आरारूट पावडर पण वापरू शकता. .

Reviews for Sweet Kachori Recipe in Marathi (0)