उपवासाची चटपटी भाकरवडी | Upvasachi chatpati bhakarvadi Recipe in Marathi

प्रेषक tejswini dhopte  |  18th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upvasachi chatpati bhakarvadi recipe in Marathi,उपवासाची चटपटी भाकरवडी, tejswini dhopte
उपवासाची चटपटी भाकरवडीby tejswini dhopte
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  1

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

4

0

उपवासाची चटपटी भाकरवडी recipe

उपवासाची चटपटी भाकरवडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upvasachi chatpati bhakarvadi Recipe in Marathi )

 • १वाटी राजगिरा पिठ
 • १वाटी शिंगाडा पिठ
 • प्रत्येकी १/२वाटी भाजलेल्या शेंगदाणे पावडर ,तिळ पावडर खोबरे किस
 • २,३चमचे साखर
 • चविनुसार मीठ
 • १/२चमचा आमचुर पावडर
 • १/२चमचा चाट मसाला
 • १,२चमचे खजूर इमली चटणी
 • १चमचा तिखट /हिरवीमिरची पॆस्ट
 • १/२चमचा जिरे पावडर
 • तेल तळण्यासाठी

उपवासाची चटपटी भाकरवडी | How to make Upvasachi chatpati bhakarvadi Recipe in Marathi

 1. कढईत २चमचे तेल टाकून. सगळी सामग्री टाकून. ५-७मि परतायचं आणि मिश्रण थंड करायच
 2. दोन्ही पिठ एकत्र करून त्यात मीठ चिमूटभर साखर १चमचा मोहन लावून पिठ घट्टसर मळून घ्यावे.
 3. नंतर पाती लाटून घ्यावी पण एकदम पातळ नको
 4. मग त्यावर थोडी इमलीखजुर चटणी पसरून. घ्यावी आणि मिश्रण खुप कोरडे करू नये आधीच
 5. मग पातीवर पसरवून हळूहळू रोल करून. बारीक बारीक भाकरवडी कापून मध्यम गॅसवर तळून घ्यावे
 6. मग काय रेडि टु इट

My Tip:

मसाला थोडा अोलसर ठॆवायचा म्हणजे पतीवर बरोबर बसतो.

Reviews for Upvasachi chatpati bhakarvadi Recipe in Marathi (0)