उपवासाचे खवा मोदक | Khava Modak Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khava Modak recipe in Marathi,उपवासाचे खवा मोदक, Bharti Kharote
उपवासाचे खवा मोदकby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

उपवासाचे खवा मोदक recipe

उपवासाचे खवा मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khava Modak Recipe in Marathi )

 • एक वाटी वरईच पीठ
 • अर्धी वाटी शिंगाडा पीठ
 • दोन चमचे साजूक तूप
 • दूध आवश्यकतेनुसार
 • चवीनुसार मीठ
 • सारणासाठी
 • एक वाटी खवा तुपात भाजून
 • ओले खोबरे खीस तीन चमचे
 • पीठी साखर पाऊण वाटी
 • वेलची पूड पाव चमचा
 • तळण्यासाठी तेल

उपवासाचे खवा मोदक | How to make Khava Modak Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात दोन्ही पीठ घ्या.
 2. त्यात मीठ तूप दूध घालून पीठ चांगल मळून घ्याव. .
 3. चांगल एकजीव करून मऊ गोळा बनवा.
 4. 10मी बाजूला ठेवा.. तोपर्यंत सारण बनवून घ्या. .
 5. एका पॅन मध्ये खवा खोबरे खीस परतवून घ्या. .गॅस बंद करा. .
 6. त्यांत पीठी साखर वेलची पूड घालून चांगल मिक्स करून घ्या. .
 7. गोळ्याची छोटी पारी करून त्यांत सारण भरून मोदकाचा आकार दया..
 8. सर्व मोदक बनवून घ्या. .
 9. पॅन मध्ये तेल तापत ठेवा.
 10. त्यात मोदक मंद आचे वर तळून घ्या. .
 11. खमंग तळून घ्या. .
 12. आणि गरम गरम खायला दया. .

My Tip:

मोदक तळतांना मंद आचे वरच तळावेत कुरकुरीत होतात. .

Reviews for Khava Modak Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo