Photo of Upwas cake by Swati Kolhe at BetterButter
2130
8
0.0(1)
0

Upwas cake

Aug-19-2018
Swati Kolhe
15 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २०० gm शिंगाड्याचे पीठ
  2. १०० ml तूप
  3. पिठी साखर १०० ग्राम
  4. खजूर १५-२०
  5. बेकिंग पावडर १ tsp
  6. खायचा सोडा १/२ tsp
  7. वेलची पूड १/२ tsp
  8. नेस कॉफी ३-४ पाकीट १ rps चे
  9. दूध १/२ कप
  10. पिठी साखर १/२ कप
  11. १५-२० काजू बदाम काप
  12. व्हॅनिला इसेन्स १/२ tsp(ऑप्शनल)

सूचना

  1. अर्धी वाटी दूध गरम करून खजूराच्या बिया काढून या दुधात भिजत घालावे
  2. शिंगाड्याचे पीठ, कॉफी पावडर, बेकिंग पावडर, सोडा व वेलची पावडर एकत्र करून तीन ते चार वेळा चाळून घ्यावे.
  3. खजूर दुधासकट मिक्सरला फिरवून बारीक करून घ्या.
  4. तूप, पिठी साखर, वाटलेला खजूर एकत्र परातीत घेऊन फेसावे.
  5. चाळलेले पीठ फेसलेल्या तुपात मिसळून फेसावे. लागेल तसे दूध मिसळावे.
  6. त्या मिश्रणात पिठी साखर घालून नीट मिसळावी.
  7. केक बॅटर मध्ये अर्धे काजू/बदामाचे काप टाकून मिक्स करावे(टीप १)
  8. ज्यात केक बनवायचा त्या भांड्याला तुपाचा हात लावून थोडे शिंगाडा पीठ घालून एकसारखे करून घ्या.
  9. आता त्यात मिश्रण ओतावे व वरून उरलेले काजू बदाम घालावे.
  10. १८० डिग्रीवर ३५ मिनिटे बेक करावे.
  11. कुकर मध्ये करायचे असल्यास केक चे भांडे कुकर मध्ये ठेऊन पहिली १० मिनीट फुल गॅस वर व नंतर मध्यम गॅस करून २० मिनीट बेक करावा.(टीप २)
  12. टीप:
  13. १. काजू बदाम केक मध्ये किंवा वरून घालण्याआधी त्यात १/२ tsp पीठ घालून घोळून घ्यावे म्हणजे केक बेक होताना ते तळाशी जात नाही.
  14. २. कुकर मध्ये फरक असल्यामुळे २०-२५ मिनीट नंतर सुरी केक मध्ये घालून झाला की ते बघून घ्यावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Aug-19-2018
tejswini dhopte   Aug-19-2018

Are wa

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर