फराळी मोमोज | Farali Momo Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Farali Momo recipe in Marathi,फराळी मोमोज, Archana Chaudhari
फराळी मोमोजby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

फराळी मोमोज recipe

फराळी मोमोज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Farali Momo Recipe in Marathi )

 • सारणासाठी- ताजे खोबरे १/२ कप (बारीक किसून घेतलेले)
 • बटाटा १/२ कप (बारीक किसून घेतलेले)
 • साखर १ टीस्पून
 • मीठ चवीनुसार
 • लिंबू रस 1 टीस्पून
 • जिरे पावडर 1 टीस्पून (भाजून घेतलेले)
 • हिरवी मिरची,आले पेस्ट २ टीस्पून
 • कव्हरसाठी- शिंगड्याचे पीठ १ कप
 • पाणी ३/४ कप
 • तूप १ टीस्पून
 • मीठ १/२ टीस्पून
 • चटणीसाठी-हिरवी मिरच्या ३
 • काळे मीठ १ टीस्पून
 • साधे मीठ चवीनुसार
 • लिंबू १ मोठे

फराळी मोमोज | How to make Farali Momo Recipe in Marathi

 1. कव्हरसाठी एक नॉनस्टिक च्या पण मध्ये पाणी उकळायला ठेवून त्यात तूप,मीठ घाला.
 2. शिंगाड्याचे पीठ टाकून एक वाफ आणा.
 3. गॅस बंद करून १० मिनिटे झाकून ठेवा.
 4. तेलाचा आणि पाण्याचा हात लावून मळून गोळा करून घ्या.
 5. सारणासाठी बटाटा वेळेवरच किसा आणि त्यातील पाणी पिळून काढा.
 6. एका भांड्यात किसलेले खोबरे,किसलेला बटाटा,साखर, मीठ,लिंबू रस, जिरे पावडर,हिरवी मिरची आले पेस्ट घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
 7. हे मिश्रण एका पॅन मध्ये टाकून २ ते ४ मिनिटे जस्ट परतवून घ्या.
 8. आता कव्हर साठी बनविलेल्या गोळ्यांचे सारखे भाग करून छोटे छोटे गोळे बनवून घ्या.
 9. ह्या गोळ्यांच्या लहान लहान पुऱ्या लाटून घ्या.
 10. तळहाताला तेल लावून एक पुरी हातात घेऊन त्यावर थोडे सारण भरून त्रिकोणी आकाराचे मोमो बनवा.
 11. याप्रमाणे सगळे मोमोज बनवून घ्या.
 12. आता वाफवण्यासाठी पाण्याला उकळी आल्यावर वाफवायच्या भांड्यात एक कापडा ठेवून त्यावर हे मोमोज पाण्यात बुडवून ठेवा.
 13. २० मिनिटे वाफवून घ्या.
 14. चटणीसाठी मिरची आणि मीठ बारीक कुटून घ्या,आणि त्यात काळे मीठ,साधे मीठ,लिंबू पिळून टाका.
 15. गरम गरम मोमोज टेस्टी टेस्टी चटणीसोबत सर्व्ह करा.

My Tip:

तुम्ही वरई चे पीठ वापरू शकता.

Reviews for Farali Momo Recipe in Marathi (0)