वरीच्या तांदळाचे साखरेचे अनारसे | Vari rice upwas aanarse Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Vari rice upwas aanarse recipe in Marathi,वरीच्या तांदळाचे साखरेचे अनारसे, Sharwari Vyavhare
वरीच्या तांदळाचे साखरेचे अनारसेby Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

वरीच्या तांदळाचे साखरेचे अनारसे recipe

वरीच्या तांदळाचे साखरेचे अनारसे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vari rice upwas aanarse Recipe in Marathi )

 • भगर २०० ग्राम
 • पिठ्ठी साखर ५o ग्राम
 • खसखस
 • केळीचा छोटा तुकडा
 • दुध १ ते २ चमचा
 • तुप तळण्यासाठी

वरीच्या तांदळाचे साखरेचे अनारसे | How to make Vari rice upwas aanarse Recipe in Marathi

 1. भगर 3 दिवस पाण्या मध्ये भिजत घाला. त्या मधील पाणी रोज बदलावे
 2. चौथ्या दिवशी भगरी मधील सर्व पाणी काढा
 3. कपडया वर भगर सुकत ठेवा
 4. भगर अर्धवट सुकली की ती मिक्सर मधून काढा
 5. १ वाटी भगरीचे पिठ व पाव वाटी साखर असे प्रमाण घ्या
 6. हे एकत्र करून मिक्सर मधून काढून घ्या
 7. हे मिश्रण २ दिवस मुरू दया ( १ दिवस ठेवले तरी चालेल. पिठ मुरले की हवे त्या वेळी अनारसे बनवून शकतो )
 8. २ दिवसाने पिठ मोकळे करा व केळ लावून अर्धा तास ठेवा
 9. नंतर त्या मध्ये १ ते २ चमचे दुध घालावे व पिठ मळून घ्या
 10. आता पेपर वर खसखस घाला व अनारसे बनवून घ्या
 11. कढ़ईत तुप गरम करा . मध्यम गॅस वर अनारसा तळून घ्या.

My Tip:

अनारसा तळताना खसखसीची बाजू वर करा. झाऱ्याने त्यावर तुप ढकलत रहा. असे केल्याने अनारसा हसतो.

Reviews for Vari rice upwas aanarse Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo