साबुदाणा शीरा | Sago sheera Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sago sheera recipe in Marathi,साबुदाणा शीरा, Aarti Nijapkar
साबुदाणा शीराby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

साबुदाणा शीरा recipe

साबुदाणा शीरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sago sheera Recipe in Marathi )

 • भिजलेला साबुदाणा १/२ वाटी
 • तूप १ मोठा चमचा
 • गूळ १/३ वाटी
 • दूध पावडर २ मोठे चमचे
 • खोबरं किस २ मोठे चमचे
 • वेलची पूड १/२ लहान चमचा
 • ड्रायफ्रूटस काप १ लहान चमचा
 • केसर सजावटीसाठी

साबुदाणा शीरा | How to make Sago sheera Recipe in Marathi

 1. पॅन गरम करून त्यात साबुदाणा व्यवस्थित परतवून घ्या
 2. तूप घाला व तुपावर परतवून घ्या
 3. चांगले भाजून फुगले व पारदर्शक होईपर्यंत परतायचे आहेत
 4. आता दूध पावडर व गूळ घालून मिश्रण एकजीव होइपर्यंत परतवून घ्या
 5. मिश्रण छानसे एकत्र झाले की त्यात खोबऱ्याचा किस घालावा व एकजीव करून घ्यावे
 6. वेलची पूड व ड्रायफ्रूट घालून एकत्र करून गॅस बंद करावा
 7. गरमागरम साबुदाणा शीरा तयार आहे ड्रायफ्रूटस व केसरने सजावट करा

My Tip:

साखरेत शीरा करू शकता

Reviews for Sago sheera Recipe in Marathi (0)