फराळी दही पॅटिस | Fasting Dahi Pattice Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fasting Dahi Pattice recipe in Marathi,फराळी दही पॅटिस, Aarti Nijapkar
फराळी दही पॅटिसby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

फराळी दही पॅटिस recipe

फराळी दही पॅटिस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fasting Dahi Pattice Recipe in Marathi )

 • बटाटे शिजलेले ३ ते ४
 • हिरवी मिरची ३
 • जिरे १/२ लहान चमचा
 • मीठ चवीनुसार
 • वरीचे तांदूळ भिजवलेले १/२ वाटी
 • दही १ मोठी वाटी
 • काळे मीठ १/२ चमचा
 • साखर १ चमचा
 • उपवासाची हिरवी चटणी १/३ वाटी
 • खजूर चटणी १/३ वाटी
 • शेंगदाणे

फराळी दही पॅटिस | How to make Fasting Dahi Pattice Recipe in Marathi

 1. शिजवलेले बटाटे घेऊन त्याचे साल काढा मग मॅश करून त्यात हिरवी मिरची जिरे व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या
 2. मिश्रणाचे गोलाकार पॅटिस बनवून घ्या
 3. भिजवलेलं वरीचे तांदूळ एका ताटात पसरवून घाला
 4. गोलाकार पॅटिस वरीच्या तांदुळाने कोट करून घ्या
 5. पॅन गरम करून त्यात थोडं तूप किंवा तेल घालून त्यावर पॅटिस खरपूस सोनेरी रंगाचे होइपर्यंत भाजून घ्या
 6. भाजून झाल्यावर पॅटिस ताटात काढून घ्या
 7. दह्यात काळे मीठ व साखर घालून फेटून घ्या
 8. एका लहान प्लेट मध्ये दही घालून त्यावर पॅटिस ठेवून हिरवी व खजुराची चटणी घालावी तळलेले शेंगदाणे घालुन मस्त सर्व्ह करा
 9. उपवासाला लाल तिखट खाणाऱ्यांसाठी असेही तुम्ही बनवून खाऊ शकता

My Tip:

वरीचे तांदूळ लावले आज कारण पॅटिस कुरकुरीत व्हावेत

Reviews for Fasting Dahi Pattice Recipe in Marathi (0)