मुख्यपृष्ठ / पाककृती / फराळी दही पॅटिस

Photo of Fasting Dahi Pattice by Aarti Nijapkar at BetterButter
696
4
0.0(0)
0

फराळी दही पॅटिस

Aug-19-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फराळी दही पॅटिस कृती बद्दल

वाह नाव ऐकून आणि फोटो बघून तोंडाला पाणीच सुटले असेल ना? चला तर पाहूयात की ही पाककृती कशी केली ते...पॅटिस साठी बटाटे शिजवून ते मॅश केले त्यात हिरवी मिरची जिरे बारीक करून घातले चवीनुसार मीठ घालून बटाट्याचे मिश्रण एकजीव करून घेतले त्याचे पॅटिस चे आकारात बनवून घेतले भिजवलेले वरीचे तांदूळ एका ताटात पसरवून त्यात पॅटिस सर्व बाजूने घोळवून घेतले मग पॅन मध्ये तुपावर छानसे खरपूर भाजून घेतले .... दही फेटून त्यात काळे मीठ व साखर घालून त्यावर पॅटिस ठेवून हिरवी चटणी व खजूर चटणी सोबत सर्व केली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • फ्युजन
  • पॅन फ्रायिंग
  • व्हिस्कीन्ग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बटाटे शिजलेले ३ ते ४
  2. हिरवी मिरची ३
  3. जिरे १/२ लहान चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. वरीचे तांदूळ भिजवलेले १/२ वाटी
  6. दही १ मोठी वाटी
  7. काळे मीठ १/२ चमचा
  8. साखर १ चमचा
  9. उपवासाची हिरवी चटणी १/३ वाटी
  10. खजूर चटणी १/३ वाटी
  11. शेंगदाणे

सूचना

  1. शिजवलेले बटाटे घेऊन त्याचे साल काढा मग मॅश करून त्यात हिरवी मिरची जिरे व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या
  2. मिश्रणाचे गोलाकार पॅटिस बनवून घ्या
  3. भिजवलेलं वरीचे तांदूळ एका ताटात पसरवून घाला
  4. गोलाकार पॅटिस वरीच्या तांदुळाने कोट करून घ्या
  5. पॅन गरम करून त्यात थोडं तूप किंवा तेल घालून त्यावर पॅटिस खरपूस सोनेरी रंगाचे होइपर्यंत भाजून घ्या
  6. भाजून झाल्यावर पॅटिस ताटात काढून घ्या
  7. दह्यात काळे मीठ व साखर घालून फेटून घ्या
  8. एका लहान प्लेट मध्ये दही घालून त्यावर पॅटिस ठेवून हिरवी व खजुराची चटणी घालावी तळलेले शेंगदाणे घालुन मस्त सर्व्ह करा
  9. उपवासाला लाल तिखट खाणाऱ्यांसाठी असेही तुम्ही बनवून खाऊ शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर