केळ्यांची पानगी | Banana Pancake Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Banana Pancake recipe in Marathi,केळ्यांची पानगी, Aarti Nijapkar
केळ्यांची पानगीby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

0

केळ्यांची पानगी recipe

केळ्यांची पानगी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana Pancake Recipe in Marathi )

 • पिकलेली केली २ ते ३
 • शिंगाडा पीठ १ वाटी
 • गूळ किसलेलं १/३ वाटी
 • वेलची पूड १/२ लहान चमचा
 • तूप २ मोठे चमचे
 • केळीचे पान

केळ्यांची पानगी | How to make Banana Pancake Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात पिकलेले केळीचे काप करून घ्या
 2. किसलेलं गूळ , शिंगाडा पीठ व वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्या
 3. मिश्रण मऊसर असावे पानगी छान होतात
 4. आता केळीचे पान लहान गोलाकार कापून घ्यावे त्यावर हाताच्या बोटांना तूप लावून थापून घ्यावे
 5. थापून झाल्यावर त्यावर त्याच आकाराचे केळीचे पान ठेवावे
 6. पॅन मध्ये झालेले पानगी ठेवून त्यावर झाकण ठेवून वाफवून घ्यावे
 7. दोन्ही बाजूंनी वाफवून घ्यावे
 8. केल्याचे पानगी अश्याप्रकारे बनवून घ्यावे
 9. वाफवलेले पानगी तुपावर थोडे लालसर रंगाचे होइपर्यंत भाजून घ्यावे व वर गुळाचा खडा व केळ्याचे काप ठेवून सर्व्ह करावे

My Tip:

पानगी वाफवलेले व तुपावर भाजलेले दोन्हीं प्रकारे बनविले आहेत तुपावरचे पानगी खूप छान लागतात

Reviews for Banana Pancake Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo