फराळी मालपुआ | Farali Malpua Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  19th Aug 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Farali Malpua recipe in Marathi,फराळी मालपुआ, Aarti Nijapkar
फराळी मालपुआby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

14

1

फराळी मालपुआ recipe

फराळी मालपुआ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Farali Malpua Recipe in Marathi )

 • शिंगाडा पीठ १/२ वाटी
 • वरीचं पीठ १ मोठा चमचा
 • वरी चे तांदूळ १ लहान चमचा
 • मीठ किंचित
 • पाणी १/४ वाटी किंवा आवश्यकतेनुसार
 • तूप किंवा मालपुआ तळण्यासाठी
 • गूळ १/३ वाटी
 • पाणी १ वाटी
 • बदाम पिस्ते केसर सजावटीसाठी

फराळी मालपुआ | How to make Farali Malpua Recipe in Marathi

 1. प्रथम एक वाडग्यात शिंगाडा पीठ , वरीचे पीठ व किंचित मीठ घालून एकत्र करून घ्यावे
 2. थोडे थोडे पाणी घालावे
 3. व्यवस्थित एकजीव करून त्यात वरीचे तांदूळ घालावे
 4. मिश्रण एकत्र करून १० मिनिटे बाजूला ठेवून द्या
 5. आता खोलगट पण पसरट पॅन किंवा कढईत तेल तापवून घ्या
 6. मिश्रण चांगले एकत्र करून घ्या
 7. आच मध्यम करून त्यात चमच्याच्या साहाय्याने मालपुआ घालून घ्या
 8. दोन्हीं बाजूनी तळून घ्या सोनेरी रंगाचे चांगले खरपूस तळून घ्यावे
 9. अश्याप्रकारे सर्व मालपुआ तळून घ्यावे
 10. पाणी गरम करून त्यात गूळ घालून चांगलं पाक बनवून घ्यावे
 11. गरमागरम मालपुआ गुळाच्या पाकात घालून घ्या व्यवस्थित घोळवून घ्या म्हणजे मालपुआ पाक शोषून घेईल
 12. सर्व मालपुआ पाकातून काढून घ्या एका ताटात ठेवून त्यावर बदाम पिस्ते व केसर घालून सजवा
 13. मस्त उपवासासाठी मालपुआ तयार आहेत

My Tip:

गुळाच्या ऐवजी साखरेचा वापर केला तरी चालेल

Reviews for Farali Malpua Recipe in Marathi (1)

tejswini dhopte3 months ago

Khup chan
Reply
Aarti Nijapkar
3 months ago
Tysm Dear