मुख्यपृष्ठ / पाककृती / Farali Malpua

Photo of Farali Malpua by Aarti Nijapkar at BetterButter
4
6
5(1)
0

Farali Malpua

Aug-19-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. शिंगाडा पीठ १/२ वाटी
  2. वरीचं पीठ १ मोठा चमचा
  3. वरी चे तांदूळ १ लहान चमचा
  4. मीठ किंचित
  5. पाणी १/४ वाटी किंवा आवश्यकतेनुसार
  6. तूप किंवा मालपुआ तळण्यासाठी
  7. गूळ १/३ वाटी
  8. पाणी १ वाटी
  9. बदाम पिस्ते केसर सजावटीसाठी

सूचना

  1. प्रथम एक वाडग्यात शिंगाडा पीठ , वरीचे पीठ व किंचित मीठ घालून एकत्र करून घ्यावे
  2. थोडे थोडे पाणी घालावे
  3. व्यवस्थित एकजीव करून त्यात वरीचे तांदूळ घालावे
  4. मिश्रण एकत्र करून १० मिनिटे बाजूला ठेवून द्या
  5. आता खोलगट पण पसरट पॅन किंवा कढईत तेल तापवून घ्या
  6. मिश्रण चांगले एकत्र करून घ्या
  7. आच मध्यम करून त्यात चमच्याच्या साहाय्याने मालपुआ घालून घ्या
  8. दोन्हीं बाजूनी तळून घ्या सोनेरी रंगाचे चांगले खरपूस तळून घ्यावे
  9. अश्याप्रकारे सर्व मालपुआ तळून घ्यावे
  10. पाणी गरम करून त्यात गूळ घालून चांगलं पाक बनवून घ्यावे
  11. गरमागरम मालपुआ गुळाच्या पाकात घालून घ्या व्यवस्थित घोळवून घ्या म्हणजे मालपुआ पाक शोषून घेईल
  12. सर्व मालपुआ पाकातून काढून घ्या एका ताटात ठेवून त्यावर बदाम पिस्ते व केसर घालून सजवा
  13. मस्त उपवासासाठी मालपुआ तयार आहेत

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Aug-20-2018
tejswini dhopte   Aug-20-2018

Khup chan

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर