साबुदाणा लाडू | Sabudana Ladoo Recipe in Marathi

प्रेषक Archana Lokhande  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabudana Ladoo recipe in Marathi,साबुदाणा लाडू, Archana Lokhande
साबुदाणा लाडूby Archana Lokhande
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

साबुदाणा लाडू recipe

साबुदाणा लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana Ladoo Recipe in Marathi )

 • साबुदाणा १ वाटी
 • पिठीसाखर १/२ वाटी
 • साजूक तूप ३-४ चमचे
 • वेलची पूड २ चमचा
 • बदाम-काजू-मणुके आवडीप्रमाणे(थोडे बदाम आणि काजूची भरड करून घेतली.)
 • दुध २-३ चमचे

साबुदाणा लाडू | How to make Sabudana Ladoo Recipe in Marathi

 1. साबुदाणा मिक्सरवर बारीक दळून घेतला.
 2. कढईत तुप गरम करून घेतले.
 3. त्यात दळलेला साबुदाणा घातला.
 4. थोडा गोल्डन रंग आणि वास आल्यावर गँस बंद केला.
 5. मिश्रण थंड होण्यासाठी ताटात काढले.
 6. त्यात वेलची पूड,बदाम आणि काजूची भरड व मणुके घालून मिक्स करून घेतले.
 7. मिश्रण थंड झाल्यावर पिठीसाखर घालून छान मिक्स करून घेतले.
 8. आता लागेल तसे दुध घालून लाडू वळून घेतले.
 9. लाडूला वरून बदाम लावून घेतले आणि तयार झाले साबुदाणा लाडू .

My Tip:

साबुदाणा रवाळ दळून घ्यावा. लाडू खुपच छान लागतात.

Reviews for Sabudana Ladoo Recipe in Marathi (0)