राजगिरा टार्ट | Rajgira tart Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  19th Aug 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Rajgira tart recipe in Marathi,राजगिरा टार्ट, Shilpa Deshmukh
राजगिरा टार्टby Shilpa Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

5

1

राजगिरा टार्ट recipe

राजगिरा टार्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajgira tart Recipe in Marathi )

 • शिऱ्यासाठी साहित्य
 • राजगिरा पीठ 1 कप
 • गूळ किसलेला 1/2 कप
 • अंजीर काजू 4-5
 • वेलची पूड 1 tbs
 • तूप 1/2 कप
 • टार्ट साठी साहित्य
 • 1/2 कप राजगिरा पीठ
 • 1/2 कप वरीचे पीठ
 • 2 tbs पिठी साखर
 • 1/2 कप तूप
 • 2 tbs चिल्ड पाणी किंवा बर्फ

राजगिरा टार्ट | How to make Rajgira tart Recipe in Marathi

 1. एका बाऊलमध्ये दोन्ही पीठ साखर तूप छान मिक्स करा
 2. पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या प्लॅस्टिकच्या पेपरमध्ये रॅप करा
 3. काहीवेळ झाकून ठेवा किंवा फ्रिजमध्ये ठेवले तरी चालेल
 4. आता पिठाचा गोळा घेऊन छोटी पोळी लाटा आणि टार्ट पॅनमध्ये सेट करा काट्यानी मध्ये टोचे मारा
 5. वर जड धान्य ठेवा हा उपवासाचा पदार्थ आहे त्यामुळे मी पेपर कप ठेवून साबुदाणा ठेवलाय म्हणजे हे फुगणार नाही
 6. 5-7 मिनिट बेक करा
 7. आता पॅनमध्ये तूप घालून राजगिरा पीठ खमंग भाजून घ्या
 8. गूळ वेलची पूड घाला पाणी घालून मिक्स करा झाकण ठेवून दोन वाफ काढा
 9. राजगिरा शिरा तयार आहे आता बेक टार्ट मध्ये शिरा ठेवा काजू आणि अंजिराच्या तुकड्यानी गार्निश करून सर्व्ह करा.

Reviews for Rajgira tart Recipe in Marathi (1)

tejswini dhopte3 months ago

Wow
Reply
Shilpa Deshmukh
3 months ago
thank you