सोलकढी | Solkadhi Recipe in Marathi

प्रेषक Sanika SN  |  20th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Solkadhi recipe in Marathi,सोलकढी, Sanika SN
सोलकढीby Sanika SN
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

सोलकढी recipe

सोलकढी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Solkadhi Recipe in Marathi )

 • १० - १२ कोकम पाकळ्या
 • २ वाट्या खवलेला ओला नारळ
 • १ हिरवी मिरची
 • १ लसूण
 • १/२ इंच आले
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • मीठ चवीनुसार

सोलकढी | How to make Solkadhi Recipe in Marathi

 1. गरम पाण्यात कोकम पाकळ्या १५ - २० मिनिटे भिजवून ठेवणे.
 2. हलक्या हाताने चोळून कोकमाचा पूर्ण अर्क काढून घेणे व गाळून घेणे.
 3. मिक्सरच्या भांड्यात ओला नारळ, मिरची, लसूण, आले व कोमट पाणी एकत्र करून मुलायम वाटून घेणे.
 4. एका भांड्यात मलमलचे कापड ठेवून ,मिश्रण ओतून, नारळाचे दूध जमेल तितके पिळून काढून घेणे.
 5. आता उरलेले वाटण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून, पाणी घालून वाटून घेणे.
 6. पुन्हा मलमलमध्ये गाळून पिळून घेणे.
 7. त्यात चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून सर्व्ह करणे.

Reviews for Solkadhi Recipe in Marathi (0)