सुक्या खोबऱ्याच्या करंज्या | Sukya naralachya karanjya Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  20th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sukya naralachya karanjya recipe in Marathi,सुक्या खोबऱ्याच्या करंज्या, Aarya Paradkar
सुक्या खोबऱ्याच्या करंज्याby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

5

0

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या recipe

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sukya naralachya karanjya Recipe in Marathi )

 • पारी चे साहित्य
 • 1 वाटी बारीक रवा
 • 1/2 वाटी मैदा
 • दूध पिठ भिजवण्यासाठी
 • पाव चमचा मीठ
 • 2-3 चमचे तेलाचे मोहन
 • सारणाचे साहित्य
 • 2 वाटी खिसलेले खोबरे
 • 1/2 वाटी कणीक
 • 1 1/2 वाटी पिठीसाखर
 • 2 चमचे वेलची पूड
 • 3 चमचे खसखस
 • 3 चमचे मिक्स ड्राय फ्रूट
 • तळण्यासाठी तूप

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या | How to make Sukya naralachya karanjya Recipe in Marathi

 1. प्रथम रवा, मैदा, मीठ एकत्र करून घ्यावे नंतर त्यात तेलाचे कडकडीत मोहन घालावे
 2. पीठ एकत्र करून त्यात दूध घालून भिजवून 1 तास ठेवणे वन नंतर चांगले मळून घ्यावे
 3. सारणासाठी साजूक तूपावर कणीक चांगली भाजून घ्या
 4. खोबऱ्याचा खिस व खसखस भाजून घ्या
 5. नंतर भाजलेली खसखस, कणीक, खोबरे, वेलची पूड, ड्राय फ्रूट भरड एकत्र करून चांगले मिक्स करावे
 6. वरील पिठाची पारी लाटून त्यात सारण भरुन घडी घालून फिरकी चमच्याने कडा कापून करंज्या करुन तूपात तळणे

Reviews for Sukya naralachya karanjya Recipe in Marathi (0)