नारळी भात | Narali bhaat Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Narali bhaat recipe in Marathi,नारळी भात, Teju Auti
नारळी भातby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

7

0

नारळी भात recipe

नारळी भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Narali bhaat Recipe in Marathi )

 • १ वाटी बासमती तांदूळ
 • ओल्या नारळाचा किस १ वाटी
 • १ वाटी साखर
 • ५ लवंगा
 • १ चमचा वेलची पूड
 • साजूक तूप ४ चमचे
 • काजू, बदाम, किशमीस

नारळी भात | How to make Narali bhaat Recipe in Marathi

 1. तांदूळ धुऊन पाण्यात एक तास भिजवत ठेवा. एका भांडय़ात भात करण्यासाठी पाणी तापत ठेवा.
 2. एका कढईमध्ये आवश्यकतेनुसार तूप गरम करा. त्यात ४-५ लवंगा टाका. त्या तळून वर आल्यावर त्यात तांदूळ टाका. ३-४ मिनिटे मंद आचेवर परता. यानंतर तांदळात तुमच्या आवडीप्रमाणे उकळलेले पाणी घाला.
 3. तांदूळ शिजल्यानंतर त्यात वेलची पूड टाका. साखर घाला. साखर घालून हळुवार परतवा.
 4. त्या भातात साखरेचा पाक तयार झाला असेल. त्यात ओले खोबरे घाला. सोबत काजू, बदाम, किसमीसचे कापही घाला.
 5. पुन्हा हलवून एखादे मिनिट गॅसवर ठेवा. गरमागरम नारळीभात तयार आहे.

My Tip:

पाणी फार घातलेत तर भात पाणचट किंवा मऊसर होऊन जाण्याची शक्यता आहे.

Reviews for Narali bhaat Recipe in Marathi (0)