खमण | Khaman Recipe in Marathi

प्रेषक Anil Pharande  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khaman recipe in Marathi,खमण, Anil Pharande
 • तयारी साठी वेळ

  16

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

खमण recipe

खमण बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khaman Recipe in Marathi )

 • हरभरा डाळ १ कप
 • दही १/२ कप
 • हिंग १/२ टीस्पून
 • हळद १/२ टीस्पून
 • लाल मिरची पावडर १ टीस्पून
 • मीठ चवीप्रमाणे
 • आले १/२ इंच
 • हिरव्या मिरच्या २ नग
 • गरम मसाला 1/2 टीस्पून
 • तेल

खमण | How to make Khaman Recipe in Marathi

 1. १ कप हरभरा डाळ सहा तास पाण्यात भिजत ठेवा
 2. पाणी निथळून डाळ व दही मिक्सर च्या भांड्यातून जदेभरडे वाटून घ्या व १० तास आंबवण्यासाठी ठेवा
 3. आले व मिरचीची पेस्ट, १/४ चमचा हिंग, १/२ चमचा हळद, मीठ व १ टेबलस्पून तेल बॅटर मध्ये घाला
 4. एका कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवा व त्यात स्टँड ठेवा
 5. ताटाला तेल लावा व त्यात बॅटर घालून स्टँडवर वाफवण्यासाठी ठेवा,
 6. कढईवर झाकण ठेवा, झाकणाला आतून कापड लावा
 7. २५ मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्या
 8. ताट बाहेर काढून गार होण्यासाठी ठेवा
 9. खमण च्या वड्या कापा
 10. कढईमध्ये तेल गरम करा त्यात खमण च्या वड्या घाला
 11. त्यात १/४ चमचा हिंग, १/२ चमचा हळद १ टीस्पून लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर व मीठ घाला, सर्व मिक्स करा
 12. लिंबाचा रस घाला व कोथिंबीरने गार्निश करा

Reviews for Khaman Recipe in Marathi (0)