मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या नारळाची चटणी

Photo of Coconut chutney by Teju Auti at BetterButter
0
3
0(0)
0

ओल्या नारळाची चटणी

Aug-21-2018
Teju Auti
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या नारळाची चटणी कृती बद्दल

ही चटणी इडली, आप्पे, मेदू वडा आणि इतर तिखट मिठाच्या दाक्षिणात्य पदार्थंबरोबर छान लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक कप ओला नारळ (खोवून)
  2. अर्धा टेबलस्पून शेंगदाण
  3. चार लसूण पाकळ्या
  4. हिरव्या मिरच्या
  5. साखर व मीठ
  6. पाव टी स्पून जिरे
  7. कोथिंबीर
  8. एक टेबल स्पून तेल
  9. एक टी स्पून मोहरी
  10. हिंग,कढीपत्ता

सूचना

  1. शेंगदाणे भाजून साले काढून घ्यावेत. ओला नारळ खोवून घ्यावा. कोथिंबीर धुऊन चिरून घ्यावी
  2. मिक्ससरच्या भांड्यात शेंगदाणे, ओला नारळ, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, साखर, मीठ, जिरे, पाव कप पाणी घालून मिक्सीरमध्ये बारीक करून घ्यावे.
  3. एका कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग, कढीपत्ता पाने, घालून फोडणी करून वाटलेल्या चटणीवरती घालावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर