विदर्भ स्पेशल सांबारवडी | Vidarbha Special Sambarvadi Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Vidarbha Special Sambarvadi recipe in Marathi,विदर्भ स्पेशल सांबारवडी, Deepa Gad
विदर्भ स्पेशल सांबारवडीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

16

0

विदर्भ स्पेशल सांबारवडी recipe

विदर्भ स्पेशल सांबारवडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vidarbha Special Sambarvadi Recipe in Marathi )

 • पारीसाठी :
 • बेसन १ वाटी
 • मैदा १/२ वाटी
 • तेल ४ च
 • तिखट १ च
 • हळद १/२ च
 • मीठ चवीनुसार
 • पाणी आवश्यकतेनुसार
 • सारणासाठी :
 • कोथिंबीर १ मोठा बाऊल
 • सुकं खोबरं किसलेलं १ वाटी
 • भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट १/२ वाटी
 • खसखस १ च
 • तीळ १ च
 • आलं लसूण मिरची पेस्ट १ च
 • तिखट १ च
 • धणेपूड १ च
 • जिरेपूड १/२ च
 • गरम मसाला १/२ च
 • काळा मसाला १/२ च
 • लिंबाचा रस १ च
 • मीठ चवीनुसार

विदर्भ स्पेशल सांबारवडी | How to make Vidarbha Special Sambarvadi Recipe in Marathi

 1. पारीसाठी :
 2. बेसन, मैदा, तिखट, मीठ तेल घालून हाताने एकजीव करा मुठी वळण्याइतपत
 3. थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळा
 4. सारणासाठी :
 5. पॅनवर खसखस, तीळ, शेंगदाण्याचा कूट थोडं गरम करून घ्या
 6. सुकं खोबरं थोडं भाजून घ्या व मिक्सरवर फिरवा
 7. हे सर्व एकत्र करा त्यात सर्व मसाले व इतर जिन्नस घाला
 8. कोथिंबीर धुवून कपड्यावर सुकवा आणि मग चिरून वरील मिश्रणात घालुन एकजीव करा
 9. मळलेल्या पिठाचे १० समान गोळे करा व तेल लावून लाटा वरून तेल लावा, सारण भरा
 10. फोल्ड करून पाणी लावून चिकटवा, अशा प्रकारे सर्व बनवून घ्या
 11. तेलात डीप फ्राय करा
 12. गरमा गरम टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा

My Tip:

सारणात तुम्ही शेंगदाण्याच्या कूट ऐवजी चारोळी घालू शकता

Reviews for Vidarbha Special Sambarvadi Recipe in Marathi (0)