मुख्यपृष्ठ / पाककृती / विदर्भ स्पेशल सांबारवडी

Photo of Vidarbha Special Sambarvadi by Deepa Gad at BetterButter
1054
11
0.0(0)
0

विदर्भ स्पेशल सांबारवडी

Aug-21-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

विदर्भ स्पेशल सांबारवडी कृती बद्दल

ही नागपूरची विदर्भ स्पेशल रेसिपी आहे, याला पुडाची वडी देखील म्हणतात, मी यात थोडे बदल करून बनविली आहे, चव खूपच छान आहे

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. पारीसाठी :
  2. बेसन १ वाटी
  3. मैदा १/२ वाटी
  4. तेल ४ च
  5. तिखट १ च
  6. हळद १/२ च
  7. मीठ चवीनुसार
  8. पाणी आवश्यकतेनुसार
  9. सारणासाठी :
  10. कोथिंबीर १ मोठा बाऊल
  11. सुकं खोबरं किसलेलं १ वाटी
  12. भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट १/२ वाटी
  13. खसखस १ च
  14. तीळ १ च
  15. आलं लसूण मिरची पेस्ट १ च
  16. तिखट १ च
  17. धणेपूड १ च
  18. जिरेपूड १/२ च
  19. गरम मसाला १/२ च
  20. काळा मसाला १/२ च
  21. लिंबाचा रस १ च
  22. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पारीसाठी :
  2. बेसन, मैदा, तिखट, मीठ तेल घालून हाताने एकजीव करा मुठी वळण्याइतपत
  3. थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळा
  4. सारणासाठी :
  5. पॅनवर खसखस, तीळ, शेंगदाण्याचा कूट थोडं गरम करून घ्या
  6. सुकं खोबरं थोडं भाजून घ्या व मिक्सरवर फिरवा
  7. हे सर्व एकत्र करा त्यात सर्व मसाले व इतर जिन्नस घाला
  8. कोथिंबीर धुवून कपड्यावर सुकवा आणि मग चिरून वरील मिश्रणात घालुन एकजीव करा
  9. मळलेल्या पिठाचे १० समान गोळे करा व तेल लावून लाटा वरून तेल लावा, सारण भरा
  10. फोल्ड करून पाणी लावून चिकटवा, अशा प्रकारे सर्व बनवून घ्या
  11. तेलात डीप फ्राय करा
  12. गरमा गरम टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर