खोबरे पाक | Khobre Paak Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  22nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khobre Paak recipe in Marathi,खोबरे पाक, Renu Chandratre
खोबरे पाकby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

खोबरे पाक recipe

खोबरे पाक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khobre Paak Recipe in Marathi )

 • सुकं खोबरं / डेसीकेटेड कोकोनट 2 कप
 • साखर 1 कप
 • खोआ किंवा मावा 3/4 कप
 • पाणी 1/2 कप
 • वेलची पूड १/२ चमचा
 • चारोळी १ मोठा चमचा
 • तूप 1 चमचा , प्लेटला लावायला

खोबरे पाक | How to make Khobre Paak Recipe in Marathi

 1. सर्व साहित्य एकत्रित करा
 2. एका कढईत सुकं खोबरं मंद आचेवर 5 मिनिटे भाजून घ्या
 3. खवा तयार ठेवा
 4. एका भांड्यात साखर आणि पाण्याचा चा घट्ट पाक तयार करा
 5. खोबरे जरा वेळ भाजून झाले की त्यात खवा टाकून , व्यवस्थित मिक्स करावे
 6. मंद आचेवर परतत रहावे
 7. आता ह्यात तयार साखरेचा पाक घालावे , आणि व्यवस्थित एकजीव मिक्स होईपर्यंत , सतत मिक्स करावे । शेवटी वेलची पूड आणि चारोळी घालून गॅस बंद करावे
 8. एका तूप लावलेल्या प्लेट मधे , तयार मिश्रण काढावे
 9. वरून चारोळीनि सजवावे । जरा वेळानं मिश्रण सेट झाले की वड्या कापाव्यात
 10. पूर्णपणे गार झाल्यावर हवा बंद डब्यात भरून ठेवावे आणि सर्व्ह करावे ।

Reviews for Khobre Paak Recipe in Marathi (0)