ओल्या नारळाचे मोदक | Fried modak Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  22nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fried modak recipe in Marathi,ओल्या नारळाचे मोदक, Teju Auti
ओल्या नारळाचे मोदकby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

ओल्या नारळाचे मोदक recipe

ओल्या नारळाचे मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fried modak Recipe in Marathi )

 • २ नारळ खवून
 • २ वाटी पिवळाधमक चिरलेला गूळ
 • ३ टेबलस्पून तूप
 • वेलदोडयांची पूड
 • १ वाटी मैदा
 • १ वाटी रवा
 • चिमूटभर मीठ
 • तेल
 • दूध
 • पाणी

ओल्या नारळाचे मोदक | How to make Fried modak Recipe in Marathi

 1. रवा, मैदा, ३ टेबलस्पून कडकडीत तूपाचे मोहन व चिमूटभर मीठ घालून शक्यतो पाण्याने घट्ट भिजवून १ तास झाकून ठेवावे.
 2. २ खवलेले नारळ, गूळ घालून सारण चिकट होईल असे शिजवून घ्यावे व वेलदोडा पूड घालून ठेवावे.
 3. भिजलेला मैदा हाताने चांगला मळून लाटया कराव्यात. पोळपाटावर पुरीएवढी लाटी लाटावी.हातावर घेऊन मुखर्‍यापाडून वाटी करावी. सारणमध्ये भरावे व मोदकांचे तोंड बंद करावे .सर्व मोदक भरून घ्यावेत.
 4. कढईत मंद आचेवर सर्व मोदक गुलाबी रंगावर तळून घ्यावे.

My Tip:

पिठ थोडे कोरडे असल्याने बंद केलेली कळी बर्‍याचदा तेलात उघडली जाते आणि सारण बाहेर येते. थोडे दुध लावल्यास कळी बंद होते.

Reviews for Fried modak Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo