गोड नारळी भात | Sweet coconut rice Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  22nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet coconut rice recipe in Marathi,गोड नारळी भात, Manisha Sanjay
गोड नारळी भातby Manisha Sanjay
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

गोड नारळी भात recipe

गोड नारळी भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet coconut rice Recipe in Marathi )

 • बासमती तांदूळ - १ वाटी
 • ताजे किसलेले खोबरे - ३/४ वाटी
 • गुळ - १/२ वाटी
 • लवंग - ४
 • वेलची पावडर - १/४ टीस्पून
 • तूप - २ टेबलस्पून
 • मीठ - १/४ टीस्पून
 • केसर-५/६ काड्या

गोड नारळी भात | How to make Sweet coconut rice Recipe in Marathi

 1. बासमती तांदूळ धुवून १५-२० मिनिटे भिजवून ठेवा.
 2. कुकर मध्ये १ टेबलस्पून तूप घाला. त्यात लवंग आणि तांदूळ घालून परतून घ्या. केसर आणि मीठ घाला.
 3. १ +१/२ वाटी पाणी घालून ३ शिट्ट्या द्या.
 4. एक कढई गॅस वर ठेऊन त्या मध्ये १ टेबलस्पून तूप घालून, गुळ आणि खोबरे घालून चांगले मिक्स करून घ्या. वेलची पावडर घाला. मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करा.
 5. कुकर उघडा आणि त्यात गूळ खोबरे मिश्रण घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्या.
 6. कुकर चे झाकण लावून १५-२० मिनिटे ठेवून द्या.

My Tip:

आवडीनुसार सुका मेवा घालू शकतो.

Reviews for Sweet coconut rice Recipe in Marathi (0)