मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजार आमटी

Photo of Bajar Aamati by Arya Paradkar at BetterButter
8824
1
0.0(0)
0

बाजार आमटी

Aug-23-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजार आमटी कृती बद्दल

झणझणीत

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ** मिक्स धान्यांचे रवा साहित्य
  2. 1/2 वाटी तुर डाळ
  3. 1/2 वाटी मुग डाळ
  4. 1/2 वाटी उडीद डाळ
  5. 1/2 चणा डाळ
  6. 3 चमचे तांदूळ
  7. 3 चमचे गहू
  8. ** मसाला साहित्य
  9. 7-8 लवंगा
  10. 7-8 मिरे
  11. 2 इंच दालचिनी तुकडा
  12. 1 चमचा खसखस
  13. 1 चमचा जिरे
  14. 2 चमचा तिळ
  15. 1 चमचा शेंगदाणे
  16. 1/2 खिसलेले खोबरे
  17. ** फोडणी साहित्य
  18. 1/2 हळद
  19. पाव चमचा हिंग
  20. 2 चमचे आले लसुण पेस्ट
  21. 1 चमचा धणे जिरे पावडर
  22. 1 चमचा तिखट
  23. 2 चमचे कांदा लसूण मसाला
  24. कोथिंबीर
  25. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम सर्व डाळी व गहू, तांदूळ खमंग भाजून मिक्सरवर रवाळ (भरडलेले )पिठ करुन घ्यावे
  2. नंतर मसाला साहित्य ,लवंग, मिरे, दालचिनी, तिळ, शेंगदाणे, खोबरे ,खसखस व जीरे, खमंग भाजून मिक्सरवर वाटून घ्यावे
  3. 2 तांबे पाणी गरम करण्यास ठेवणे
  4. नंतर एका भांड्यात नेहमी पेक्षा जास्त तेल घालून फोडणी करुन त्यात आले लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे
  5. फोडणीत तयार केलेला मसाला घालून परतणे व नंतर कांदा लसूण मसाला, तिखट घालून हलवणे
  6. नंतर वरील भरडलेल्या पिठातील 3-4 चमचे पिठ घालून चांगले परतून घ्यावे
  7. उकळलेले पाणी घालून चांगले एकजीव करावे
  8. वर तेलाची तर्री येई पर्यंत खळखळून उकळी आणावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर