कोकोनट ट्रँगल | Coconut Triangle Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  23rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut Triangle recipe in Marathi,कोकोनट ट्रँगल, Deepa Gad
कोकोनट ट्रँगलby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

कोकोनट ट्रँगल recipe

कोकोनट ट्रँगल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut Triangle Recipe in Marathi )

 • डेसिकेटेड कोकोनट १/२ वाटी
 • मैदा १/२ वाटी
 • पाणी १/२ वाटी
 • साखर १/२ वाटी
 • वेलचीपूड

कोकोनट ट्रँगल | How to make Coconut Triangle Recipe in Marathi

 1. पॅनवर पाणी, डेसिकेटेड कोकोनट घालून २ मिनिटे गरम करा
 2. गॅस बंद करून मैदा टाका,
 3. चमच्याने एकजीव करा आणि झाकुन १० मिनिटे ठेवा
 4. दुसऱ्या भांड्यात साखर घेऊन थोडेसेच पाणी घाला व एकतारी पाक बनवा
 5. १० मिनिटानंतर पीठ चांगले मळून घ्या
 6. कढईत तेल तापत ठेवा
 7. पोळपाटावर गोळा घेऊन जाडसर लाटा किंवा हातानेच थापून घ्या
 8. फोर्कने वरचेवर अलगद टोचा मारून घ्या
 9. नंतर त्यावर सुरीने अलगद छेद द्या
 10. पोळी पालटून परत फोर्कने व सुरीने तसेच करा
 11. शंकरपाळीच्या कातन्याने किंवा सुरीने चार उभे भाग कापा नंतर त्रिकोणी कापा
 12. तेलात लालसर होईपर्यंत मंद आचेवर तळून घ्या
 13. पाकात घाला व डिश मध्ये काढा वरून डेसिकेटेड कोकोनट घालून सर्व्ह करा

My Tip:

काही नाही

Reviews for Coconut Triangle Recipe in Marathi (0)