वेजीटेबल कोकोनट बिर्याणी | Vegetables coconut biryani Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  24th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Vegetables coconut biryani recipe in Marathi,वेजीटेबल कोकोनट बिर्याणी, seema Nadkarni
वेजीटेबल कोकोनट बिर्याणीby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

वेजीटेबल कोकोनट बिर्याणी recipe

वेजीटेबल कोकोनट बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vegetables coconut biryani Recipe in Marathi )

 • 1 1/2 कप बासमती तांदूळ
 • 1/2 कप नारळाचे दूध
 • 1-2 चमचा दही
 • 1-2 चमचा आले लसुण पेस्ट
 • 2 कप मिक्स भाज्या चिरलेल्या ( भोपळी मिरची, फ्लॉवर, मटार, गाजर)
 • 1 टी स्पून लाल तिखट
 • 1 टी स्पून धणे जिरे पूड
 • 1/2 टी स्पून हळद
 • 2 मोठा चमचा तेल फोडणी साठी
 • 2 बारीक चिरलेला कांदा
 • 2 कप तळलेले कांदे
 • चवी पुरते मीठ
 • 1 चमचा बिर्याणी मसाला
 • लवंगा, दालचिनी, तमालपत्र, लाल सुक्या मिरच्या

वेजीटेबल कोकोनट बिर्याणी | How to make Vegetables coconut biryani Recipe in Marathi

 1. बासमती तांदूळ धुवून 1/2 तास भिजत ठेवा. दूप्पट पाणी घालून भात अधॉ कच्चा शिजवून घ्या.
 2. दही मध्ये बिर्याणी मसाला घालून एकत्र करून घ्यावे.
 3. सगळ्या भाज्या एक दोन उकळी आल्यावर गॅस बंद करावा.
 4. कांदा तेलात तळून घ्यावे.
 5. कढईत तेल तापवून, त्यात सगळे गरम मसाले घालून परतून घ्या.
 6. त्यात आले लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे.
 7. बारीक चिरलेला कांदा घालावा.
 8. सवॅ भाज्या घालून एकत्र करावे, त्यात ओल्या नारळाचे दुध घालुन एकत्र करावे.
 9. 1-2 चमचा दही घालून एकत्र करून, 1 मिनिटे झाकून ठेवावे. नंतर त्यात तळलेला कांदा घालावा.
 10. मग त्यात मीठ, हळद, धणे जिरे पावडर, मिरची पूड घालून एकत्र करावे.
 11. त्यात शिजवून घेतलेल भात घालून व्यवस्थित एकत्र करावे.. व 1-2 मिनिटे झाकून ठेवावे.
 12. वरुन कोथिंबीर घालून सवँ करावे.

Reviews for Vegetables coconut biryani Recipe in Marathi (0)