मुख्यपृष्ठ / पाककृती / वेजीटेबल कोकोनट बिर्याणी

Photo of Vegetables coconut biryani by seema Nadkarni at BetterButter
178
0
0(0)
0

वेजीटेबल कोकोनट बिर्याणी

Aug-24-2018
seema Nadkarni
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेजीटेबल कोकोनट बिर्याणी कृती बद्दल

नारळाच्या दुध चा वापर करून बिर्याणी बनवले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 1/2 कप बासमती तांदूळ
  2. 1/2 कप नारळाचे दूध
  3. 1-2 चमचा दही
  4. 1-2 चमचा आले लसुण पेस्ट
  5. 2 कप मिक्स भाज्या चिरलेल्या ( भोपळी मिरची, फ्लॉवर, मटार, गाजर)
  6. 1 टी स्पून लाल तिखट
  7. 1 टी स्पून धणे जिरे पूड
  8. 1/2 टी स्पून हळद
  9. 2 मोठा चमचा तेल फोडणी साठी
  10. 2 बारीक चिरलेला कांदा
  11. 2 कप तळलेले कांदे
  12. चवी पुरते मीठ
  13. 1 चमचा बिर्याणी मसाला
  14. लवंगा, दालचिनी, तमालपत्र, लाल सुक्या मिरच्या

सूचना

  1. बासमती तांदूळ धुवून 1/2 तास भिजत ठेवा. दूप्पट पाणी घालून भात अधॉ कच्चा शिजवून घ्या.
  2. दही मध्ये बिर्याणी मसाला घालून एकत्र करून घ्यावे.
  3. सगळ्या भाज्या एक दोन उकळी आल्यावर गॅस बंद करावा.
  4. कांदा तेलात तळून घ्यावे.
  5. कढईत तेल तापवून, त्यात सगळे गरम मसाले घालून परतून घ्या.
  6. त्यात आले लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे.
  7. बारीक चिरलेला कांदा घालावा.
  8. सवॅ भाज्या घालून एकत्र करावे, त्यात ओल्या नारळाचे दुध घालुन एकत्र करावे.
  9. 1-2 चमचा दही घालून एकत्र करून, 1 मिनिटे झाकून ठेवावे. नंतर त्यात तळलेला कांदा घालावा.
  10. मग त्यात मीठ, हळद, धणे जिरे पावडर, मिरची पूड घालून एकत्र करावे.
  11. त्यात शिजवून घेतलेल भात घालून व्यवस्थित एकत्र करावे.. व 1-2 मिनिटे झाकून ठेवावे.
  12. वरुन कोथिंबीर घालून सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर