मुख्यपृष्ठ / पाककृती / रोझ कोकोनट बर्फी

Photo of Rose Coconut burfi by Shraddha Juwatkar at BetterButter
608
3
0.0(0)
0

रोझ कोकोनट बर्फी

Aug-25-2018
Shraddha Juwatkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रोझ कोकोनट बर्फी कृती बद्दल

मी ह्या बर्फी मध्ये Rooh Afza चा वापर केला आहे त्या मुळे ही बर्फी खूपच चवीष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव

साहित्य सर्विंग: 6

  1. दोन नारळाचे किसलेले खोबरे
  2. 1 लिटर दूध
  3. 100 ग्राम मावा
  4. 2 कप साखर
  5. 2 थेंब रोझ ईसेनस
  6. 2 टेबलस्पून रूहअफझा सिरप
  7. 1 टीस्पून रोझ रेड कलर
  8. तूप
  9. बदाम पिस्ते उभे काप करुन घेणे

सूचना

  1. प्रथम खोबरे किसून घ्यावे व मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यावे
  2. एका पॅन मध्ये दूध व खोबरे एकत्र करून मध्यम आचेवर दूध आटेपर्यंत ढवळत राहावे.
  3. आता त्यात खवा, साखर, रूहअफझा, रोझ ईसेनस व कलर घालून चांगले एकजीव करुन घ्यावे. मिश्रण घट्ट होईपर्यंत व्यवस्थीत ढवळावे .
  4. एका डिशला थोडे तूप लावून त्या वर मिश्रण घालून हलक्या हाताने थापून घेणे व बदाम पिस्ता चे उभे काप करुन त्यावर पसरावे
  5. 4 तास फिरॣज मध्ये सेट करण्यासाठी ठेवून देणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर