ओनियन करी | Onion curry Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  25th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Onion curry recipe in Marathi,ओनियन करी, seema Nadkarni
ओनियन करीby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

ओनियन करी recipe

ओनियन करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Onion curry Recipe in Marathi )

 • 4-5 बेबी कांदे
 • 1/4 कप सूक खोबरे
 • 2 कांदे
 • 2-3 टोमॅटो
 • 1 चमचा खडे मसाला ( लवंग, दालचिनी, मीरे, तमालपत्र, धणे जिरे,
 • फोडणी साठी तेल
 • 1 चमचा आले लसुण पेस्ट
 • 1 टी स्पून लाल तिखट
 • 1/2 टी स्पून हळद

ओनियन करी | How to make Onion curry Recipe in Marathi

 1. सौ प्रथम बेबी कांद्याच्या मध्ये काप करून पाण्यात भिजवून घ्यावे.
 2. एका पेन मध्ये थोडे तेल घालून किसलेले खोबरे घालून ब्राऊन होईल तोपर्यंत परतून घ्या.
 3. असे च सगळे खडे मसाले पण भाजून घ्या.
 4. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात 2 कांद्याची पेस्ट घालून ब्राऊन होईल तोपर्यंत परतून घ्या. त्यात आले लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे.
 5. टोमॅटो ची पेस्ट घालून परतून घ्यावे, तेल सुटेल पयॅत परतावे.
 6. खडे मसाले आणि खोबरे मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. व ते वरील मिश्रणात घालून एकत्र करावे..
 7. त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ, हळद टाकावी व थोडे पाणी घालून झाकण ठेवून एक उकळी आणावी.
 8. त्यात शिजवून घेतलेल कांदे घालून परत 10 मिनिटे झाकून उकळी आणावी. कोथिंबीर घालून सवँ करावे.

Reviews for Onion curry Recipe in Marathi (0)