बीट केशर नारळी भात ( हळदी कुंकू) | Beet keshar narali bhat ( Haladi kunku) Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  26th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Beet keshar narali bhat ( Haladi kunku) recipe in Marathi,बीट केशर नारळी भात ( हळदी कुंकू), Aarya Paradkar
बीट केशर नारळी भात ( हळदी कुंकू)by Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

3

0

बीट केशर नारळी भात ( हळदी कुंकू) recipe

बीट केशर नारळी भात ( हळदी कुंकू) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beet keshar narali bhat ( Haladi kunku) Recipe in Marathi )

 • 2 वाट्या शिजवलेला भात
 • 1 1/2 वाटी गूळ
 • 1/2 साखर
 • 1 /2 किसलेला बीट
 • 1/2 चमचा जायफळ
 • 1 चमचा वेलची पावडर
 • 5-6 लवंगा
 • 4-5 चमचे तूप
 • पाव वाटी केशर काड्या दुधात विरघळलेल्या
 • १ वाटी नारळ

बीट केशर नारळी भात ( हळदी कुंकू) | How to make Beet keshar narali bhat ( Haladi kunku) Recipe in Marathi

 1. प्रथम कुकरमध्ये भात शिजवून घ्यावा
 2. नंतर सर्व साहित्य एकत्र जमवणे
 3. नंतर भातात गुळ ,साखर, खोबरे, जायफळ पावडर, वेलची पावडर घालणे
 4. तपात लवंगा परताव्या व त्या लवंगा तूपा सहित भातात घालून चांगले परतून घ्यावे
 5. नंतर या भाताचे दोन भाग करणे
 6. एका भागात केशराचे दूध घालून चांगले परतून घ्यावे
 7. तुपात बीट घालून चांगले परतून घ्यावे
 8. परतलेल्या बीटात राहिलेला दुसरा भाग घालून चांगले परतून घ्यावे
 9. नंतर या भाताच्या मुदी पाडणे व सर्व्ह करणे

Reviews for Beet keshar narali bhat ( Haladi kunku) Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo