नारळीभात | Coconut Rice Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  26th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut Rice recipe in Marathi,नारळीभात, Bharti Kharote
नारळीभातby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

नारळीभात recipe

नारळीभात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut Rice Recipe in Marathi )

 • एक वाटी बासमती तांदुळ
 • एक वाटी नारळाचा चव
 • एक वाटी नारळाच दूध
 • दीड वाटी गरम पाणी
 • एक वाटी गुळ खिसून
 • दोन टेबलस्पून साजूक तूप
 • 4/5 लवंगा
 • 2 वेलदोडा
 • पाव चमचा वेलची पूड
 • काजू खिसमिस एक चमचा
 • 4/5 काड्या केशर दूधात भिजून
 • पिस्ता आणि चेरी सजावट साठी

नारळीभात | How to make Coconut Rice Recipe in Marathi

 1. तांदुळ स्वच्छ धूऊन पाणी नितरून घ्या. .
 2. गॅस वर कढाई ठेवून त्यात तूप घालून लवंगा आणि वेलदोडा घाला. .
 3. त्यांत तांदूळ परतवून घ्या. .
 4. त्यांत काजू खिसमिस बदाम घाला. .
 5. नारळाचा चव त्यात घाला. .
 6. आता नारळाच दूध घाला. .
 7. आता गूळ वेलची पूड घाला. .
 8. चांगल हलवून घ्या. .आणि केशर चे दूध घालून चांगल हलवा. .गरम पाणी घाला. .
 9. आता 10 मी.झाकण ठेवून मंद आचे वर शिजू दया. .
 10. आता झाकण ऊघडून बघा. .छान मोकळा शिजलाय. .गरम गरम सर्व्ह करा. ..पिस्ता आणि चेरी ने सजवा..

My Tip:

तुम्ही कोणताही सुगंधी तांदुळ वापरू शकता. .

Reviews for Coconut Rice Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती