भरलेली सिमला मिरची | Stuffed Simla Mirch Recipe in Marathi

प्रेषक Suchita Wadekar  |  26th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Stuffed Simla Mirch recipe in Marathi,भरलेली सिमला मिरची, Suchita Wadekar
भरलेली सिमला मिरचीby Suchita Wadekar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

9

0

भरलेली सिमला मिरची recipe

भरलेली सिमला मिरची बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffed Simla Mirch Recipe in Marathi )

 • ● मध्यम आकाराची सिमला मिरची 4
 • ● अर्धा टोमॅटो
 • ● हरभरा डाळीचे पीठ 2 चमचे
 • ● ओला नारळ अर्धी वाटी
 • ● चार चमचे दाण्याचा कूट
 • ● हिंग पाव चमचा
 • ● हळद पाव चमचा
 • ● लालतिखट 2 छोटे चमचे
 • ● काळा मसाला 1 चमचा
 • ● अर्धा चमचा साखर
 • ● कोथिंबीर
 • ● मीठ आवश्यकतेनुसार
 • ● तेल

भरलेली सिमला मिरची | How to make Stuffed Simla Mirch Recipe in Marathi

 1. 1. प्रथम सिमला मिरची धुऊन वरच्या साईडला अर्धा काप देऊन आतील बिया काढून टाकाव्यात.
 2. 2. एका प्लेटमध्ये मध्ये दाण्याचा कूट, तव्यावर हलकेसे भाजलेले बेसन पीठ, बारीक चिरलेले टोमॅटो, हिंग, हळद, लालतिखट, काळा मसाला, मीठ, साखर, ओला नारळ आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
 3. 3. त्यात दोन पळी तेल घालावे आणि चांगले मिक्स करावे.
 4. 4. नंतर याचे जेवढ्या मिरच्या असतील तेवढे भाग करावेत आणि एक एक मिरची या मसाल्याने भरून घ्यावी.
 5. 5. यानंतर गॅसवर फ्राय पॅन मध्ये थोडे तेल घालून एक एक मिरची ठेवून द्यावी आणि पाण्याचा हबका मारून झाकण ठेवावे, गॅसची आच मंद करावी.
 6. 6. पाच मिनिटांनी झाकण उघडून मिरची पलटी करावी आणि पुन्हा झाकण ठेवावे.
 7. 7. मिरची करपणार नाही याची काळजी घ्यावी आणि थोड्या वेळाने गॅस बंद करावा.
 8. आपली स्टफड सिमला मिर्रच तय्यार !

My Tip:

ओला नारळ नसेलतर डेसिकेटेड कोकोनट वापरावे.

Reviews for Stuffed Simla Mirch Recipe in Marathi (0)