BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेली सिमला मिरची

Photo of Stuffed Simla Mirch by Suchita Wadekar at BetterButter
290
3
0(0)
0

भरलेली सिमला मिरची

Aug-26-2018
Suchita Wadekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेली सिमला मिरची कृती बद्दल

बऱ्याच दिवसांनी मसाला भरलेली सिमला मिरची केली. हि रेसिपी मी माझ्या सासूबाईंकडून शिकले. हि भरलेली मिरची त्या अतिशय सुंदर बनवायच्या, त्यावेळी आमच्याकडे सोलर कुकर होता त्यात आम्ही हि मिरची बनवायचो. फार पूर्वी सासूबाईंनी घेतला होता. फेब्रु. ते मे हे चार महिने आम्ही त्याचा वापर करायचो कारण या काळात सोलर कुकर साठी आवश्यक असलेले ऊन आमच्याकडे भरपूर असायचे. यात केलेला वरण भात तर इतका अप्रतिम व्हायचा आहाहा... त्यावेळी आम्ही त्यात वरण भात, भरलं वांगं, भरली सिमला मिरची, मसाला भेंडी, शेंगदाणे भाजणे, रवा भाजणे, बेसन लाडूसाठीचे बेसन तूप घालून भाजणे.... आदी करत असू. सकाळी 9:30 वाजता कुकर लावायचो 12:30 ला जेवण तयार व्हायचे. आणि या प्रिहिट झालेल्या कुकर मध्ये आम्ही कधी कधी केकही करायचो. एकदम अप्रतिम, बेकरीतील slice केक सारखा होत असे. आम्ही 1वाजता केकसाठीचे बॅटर रेडी करून ठेऊन द्यायचो आणि 5 वाजेपर्यंत मस्त केक तयार व्हायचा. मध्यन्तरी तो खराब झाल्याने सध्या नाहीये आमच्याकडे पण या गोष्टी मात्र मिस करतो आम्ही.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. ● मध्यम आकाराची सिमला मिरची 4
 2. ● अर्धा टोमॅटो
 3. ● हरभरा डाळीचे पीठ 2 चमचे
 4. ● ओला नारळ अर्धी वाटी
 5. ● चार चमचे दाण्याचा कूट
 6. ● हिंग पाव चमचा
 7. ● हळद पाव चमचा
 8. ● लालतिखट 2 छोटे चमचे
 9. ● काळा मसाला 1 चमचा
 10. ● अर्धा चमचा साखर
 11. ● कोथिंबीर
 12. ● मीठ आवश्यकतेनुसार
 13. ● तेल

सूचना

 1. 1. प्रथम सिमला मिरची धुऊन वरच्या साईडला अर्धा काप देऊन आतील बिया काढून टाकाव्यात.
 2. 2. एका प्लेटमध्ये मध्ये दाण्याचा कूट, तव्यावर हलकेसे भाजलेले बेसन पीठ, बारीक चिरलेले टोमॅटो, हिंग, हळद, लालतिखट, काळा मसाला, मीठ, साखर, ओला नारळ आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
 3. 3. त्यात दोन पळी तेल घालावे आणि चांगले मिक्स करावे.
 4. 4. नंतर याचे जेवढ्या मिरच्या असतील तेवढे भाग करावेत आणि एक एक मिरची या मसाल्याने भरून घ्यावी.
 5. 5. यानंतर गॅसवर फ्राय पॅन मध्ये थोडे तेल घालून एक एक मिरची ठेवून द्यावी आणि पाण्याचा हबका मारून झाकण ठेवावे, गॅसची आच मंद करावी.
 6. 6. पाच मिनिटांनी झाकण उघडून मिरची पलटी करावी आणि पुन्हा झाकण ठेवावे.
 7. 7. मिरची करपणार नाही याची काळजी घ्यावी आणि थोड्या वेळाने गॅस बंद करावा.
 8. आपली स्टफड सिमला मिर्रच तय्यार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर