Photo of Aloo Paratha by Neelam Barot at BetterButter
4185
25
5.0(0)
0

आलू पराठा

Jun-17-2016
Neelam Barot
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू पराठा कृती बद्दल

माझ्या घरातील सगळ्यांची आवडती डीश .... प्रत्येकाला हा केवळ अप्रतिम पराठा खूप आवडतो.

रेसपी टैग

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडून लगदा लेले बटाटे - 4
  2. हिरवी मिरची व आल्ले पेस्ट - 1 टेबल स्पून
  3. लसूण पेस्ट - 1 टी स्पून ( ऐच्छिक )
  4. आपल्या चवीनुसार मीठ, साखर व लिंबाचा रस
  5. तीळ - 2 टेबल स्पून
  6. चिरलेली कोथिंबीर - 1 कप
  7. चिरलेला पुदिना अर्धा कप
  8. चाट मसाला अर्धा चमचा
  9. गरम मसाला - 1 टी स्पून
  10. पराठा कणीक : गव्हाचे पीठ 1 बाऊल, मीठ आणि पाणी
  11. सोबत खायला देण्यासाठी तूप किंवा बटर
  12. केचप किंवा हिरवी चटणी
  13. चिरलेला कांदा ( बीटरूट रस , लिंबाचा रस आणि मीठामध्ये भिजवलेला )

सूचना

  1. पहिल्यांदा चपातीसाठी कणीक तयार करून बाजूला ठेवावी.
  2. एका बाऊलमध्ये लगदा केलेला बटाटा, मिरची, लसूण व आल्ले पेस्ट मिसळून घ्यावी. त्यात तीळ, चाट मसाला व गरम मसाला देखील घालावा .
  3. आपल्या चवीनुसार मीठ, साखर व लिंबाचा रस टाकावा. ताजी कोथिंबीर व पुदिना सुद्धा घालावा.
  4. सगळे व्यवस्थित एकत्रित मिसळून घ्यावे आणि त्याचे गोळे करावेत.
  5. आता पिठाची चपाती बनवून घ्यावी, त्यात गोळा घालावा आणि पराठा बनवावा .
  6. त्यावर तूप किंवा बटर घालावे ..... केचप किंवा हिरव्या चटणीबरोबर खायला द्यावा .
  7. माझ्या खायला द्यायच्या पद्धतीने मी चिरलेला कांदा घालून पराठा सजविला.
  8. हॅपी कुकिंग.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर