मुख्यपृष्ठ / पाककृती / केशरी नारळी भात

Photo of Saffron Coconut Rice by Shruti Desai Brown at BetterButter
764
5
0.0(0)
0

केशरी नारळी भात

Aug-29-2018
Shruti Desai Brown
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केशरी नारळी भात कृती बद्दल

नारळी पौर्णिमा नुकतीच झाली पण नारळी भात फक्त नारळी पौर्णिमेला असा काहीच नियम नाही ...आणि आता गणेश चतुर्थीही अगदी जवळ आली आहे . आपल्याला नेहमी जेवताना काहीतरी नवीन हवं असतं तसेच 10 दिवसांसाठी आपल्या घरी आलेल्या बाप्पाचे सुद्धा लाड पुरवायला हवेत कि नाही? रोज रोज मोदक खाऊन बाप्पा सुद्धा कंटाळतो . मग प्रत्येक दिवशी वेगळा गोडाचा पदार्थ बनवायला हवाच . आमच्याकडे गणपतीला एक दिवस तरी नारळी भाताचा नैवेद्य दाखवला जातो . अगदी कमी वेळात आणि घरात नेहमीच उपलब्ध असणाऱ्या बेसिक साहित्यातून बनवला जाणारा नारळी भात बाप्पाचा प्रसाद म्हणून खायचीही एक वेगळीच मजा आहे . काय मग तुम्हीही करणार ना या वर्षी गणपती बाप्पा साठी केशरी नारळी भात ?

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 6

  1. साहित्य. 2 वाटी बासमती तांदूळ ,
  2. १/४ वाटी काजू तुकडे ,
  3. 1 वाटी किसलेला नारळ खोबरं ,
  4. 1 वाटी गुळ ,
  5. १/२ वाटी साखर ,
  6. ५-६ लवंग ५-६ हिरवी वेलची ,
  7. 1 तुकडा दालचिनी ,
  8. १/२ वाटी तूप

सूचना

  1. प्रथम तांदूळ स्वछ धुवून घ्यावे .
  2. एका पॅन मध्ये 1 चमचा तूप गरम झाले कि त्यात लवंग दालचिनी २-३ वेलची घालूंन धुतलेला तांदूळ घालून १-२ मिनिटं परतून त्यात पाणी घालावे .
  3. 10 मिनिटांत भात ९०% शिजवून गॅस बंद करावा . भात थोडासा मोकळा करून थंड करावा त्यामुळे तो अगदी सुटसुटीत बनतो .
  4. शिजवलेला भात
  5. भात शिजेपर्यंत 1 वाटी खोबरं १ वाटी गूळ किसून घ्यावा .
  6. सर्व पूर्वतयारी झाली कि एका कढईत तूप मंद आचेवर गरम करून घ्यावे.
  7. आता यात उरलेल्या वेलची आणि काजू तुकडे घालूंन सोनेरी रंगावर परतून घ्यावे .
  8. त्यावर खोबरं गुळ आणि साखर घालूंन परतत राहावे .
  9. गूळ खोबरं परता
  10. गूळ साखर वितळली कि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झाल्यावर त्यावर शिजवलेला भात घालून हलक्या हाताने परतून घ्या .
  11. आणि 5 मिनिटं झाकण ठेऊन एक वाफ आणली कि भात पूर्णपणे शिजत.
  12. आता झाकण काढून त्यात 2 चमचे दुधात भिजवून ठेवलेले केशर घाला आणि आवडीप्रमाणे गार्निश करून सर्व्ह करा.
  13. केशरी नारळी भात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर