मुख्यपृष्ठ / पाककृती / चवळीच्या शेंगाची दाणे घालून भाजी

Photo of Green Black eye pea curry in penut chatni. by archana chaudhari at BetterButter
1071
1
0.0(0)
0

चवळीच्या शेंगाची दाणे घालून भाजी

Aug-29-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चवळीच्या शेंगाची दाणे घालून भाजी कृती बद्दल

खान्देशात शेंगदाण्याचा वापर जास्त होतो....ह्या भाजी सोबत पोळी किंवा ज्वारीची भाकरी खातात.

रेसपी टैग

  • सोपी
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. चटणीसाठी-शेंगदाणे १ वाटी
  2. हिरव्या मिरच्या ८
  3. लसूण पाकळ्या ८
  4. जिरे १/२ टीस्पून
  5. फोडणीसाठी-तेल २ टेबलस्पून
  6. जिरे १ टीस्पून
  7. लसूण १ टीस्पून(चिरलेला)
  8. धणे पावडर १टीस्पून
  9. हळद १ टीस्पून
  10. चवळीच्या शेंगा २५० ग्रॅम(कापून उकडून घेतलेल्या)
  11. मीठ चवीनुसार

सूचना

  1. तव्यावर शेंगदाणे भाजून घ्या.
  2. हिरव्या मिरच्या भाजून घ्या.
  3. भाजलेले शेंगदाणे,भाजलेल्या हिरव्या मिरच्या, जिरे,लसूण तयार आहे.आणि त्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्या.
  4. कढईत तेल तापायला ठेवा.
  5. तेल चांगले तापल्यावर,त्यात जिरे लसूण टाका. हळद,धणे पावडर टाका.
  6. आता वाटलेली चटणी टाका.
  7. चटणी छान तेल सुटेपर्यंत परता.
  8. उकडलेल्या चवळीच्या शेंगा टाका.
  9. परतवून घ्या.
  10. २ ग्लास गरम पाणी घाला.
  11. मीठ घाला.
  12. उकळी आल्यावर कोथिंबीर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर