मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळाच्या दुधाची जेली

Photo of Coconut milk jelly by Archana Chaudhari at BetterButter
334
2
0(0)
0

नारळाच्या दुधाची जेली

Aug-29-2018
Archana Chaudhari
30 मिनिटे
तयारीची वेळ
165 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळाच्या दुधाची जेली कृती बद्दल

नारळाच्या दुधापासून बनविलेली ही सुंदर जेली बर्मिज गोड पदार्थ आहे.मी येथे अगार अगार वापरलेले आहे अगार हे व्हेज असून ते एक समुद्री वनस्पती पासून बनविलेले असते.हा एक लो कॅलरी उत्तम गोड पदार्थ आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • बॉइलिंग
 • फ्रिजिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

 1. नारळाचे दूध १ आणि १/२ कप(ताजे)
 2. नारळाचे पाणी १ कप
 3. अगार अगार च्या दांड्या १० ग्रॅम
 4. साखर १/४ कप आणि १/४ कप

सूचना

 1. नारळाचे दूध बनविण्यासाठी, नारळाच्या पाठीचा भाग काढून ते किसुन घ्या.१कप पाणी टाकून नारळाचा किस मिक्सरमधून फिरवून घ्या.
 2. कपड्याने गाळून घ्या.
 3. अगार अगार च्या दांड्या २ कप कोमट पाण्यात २०मिनिटे भिजत ठेवा.
 4. २० मिनिटानंतर भिजवलेल्या मिश्रणाचे दोन सारखे भाग करा.
 5. अगार अगार मिश्रणाचा एक भाग भांडयात गरम करा,संपूर्ण विरघळू द्या.
 6. वरील मिश्रणात नारळाचे पाणी आणि साखर टाकून गरम करून घ्या.
 7. एका पसरट ताटात वरील मिश्रण ओता आणि फ्रिज मध्ये १तास सेट करायला ठेवा.
 8. एका तासानंतर परत एका भांड्यात राहिलेल्या भिजवलेल्या अगार अगार संपूर्ण विरघळेपर्यंत गरम करा.
 9. आता यात नारळाचं दूध आणि साखर टाकून थोडेसे गरम करा.(जास्त गरम करू नका नारळाचे दूध फाटू शकते)
 10. वरील मिश्रण थोडेसे गार झाल्यावर ते फ्रीजमधील ताटात ओता आणि परत १ तास सेट होण्यास ठेवा.
 11. तयार जेली सुंदर आकारात कापा.:blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर