BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोनट मार्बल केक

Photo of Coconut Marble Cake by Sanika SN at BetterButter
0
4
0(0)
0

कोकोनट मार्बल केक

Aug-29-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकोनट मार्बल केक कृती बद्दल

खोबर्‍याची चव असलेला हा केक ब्रेकफास्टला किंवा टी टाईमलाही सर्व्ह करता येईल.

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • फ्युजन
 • बेकिंग
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

 1. १-३/४ वाटी मैदा
 2. १ वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस (डेसीकेटेड कोकोनट)
 3. १ वाटी साखर
 4. १/२ वाटी बटर (फ्रिजमधून १/२ तास आधी बाहेर काढून ठेवणे)
 5. २ अंडी (फ्रिजमधून १/२ तास आधी बाहेर काढून ठेवणे)
 6. १-१/२ वाटी दूध
 7. २ टीस्पून बेकिंग पावडर
 8. १/२ टीस्पून खायचा / बेकिंग सोडा
 9. १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स
 10. २-३ थेंब खायचा गुलाबी रंग
 11. २-३ टेस्पून कोको पावडर

सूचना

 1. प्रथम मैदा, बेकिंग पावडर व खायचा / बेकिंग सोडा एकत्र ३ वेळा चाळून घ्या.
 2. दूसर्‍या भांड्यात दूध व खोबर्‍याचा कीस एकत्र करुन भिजवून ठेवावे.
 3. एका मिक्सिंग बाऊल मध्ये (भांड्यात) बटर व साखर फेटून घेणे.
 4. आता त्यात एकावेळी एक अंडे घालून मिश्रण चांगले फेटून घेणे.
 5. आता त्यात एकदा दूध , एकदा मैद्याचे मिश्रण थोडे -थोडे घालून फेटणे. व्हॅनिला एसेन्स घालून फेटणे.
 6. तयार मिश्रणाचे ३ भाग करावे. एक भाग तसाच राहु द्यावा. दुसर्‍या भागात खायचा गुलाबी रंग घालून एकत्र करणे. तीसर्‍या भागात कोको पावडर चाळून घालणे. (मार्बल केक करायचा नसल्यास तयार मिश्रण थेट ओव्हनला बेक करण्यासाठी ठेवावे.)
 7. तूपाचा हात फिरवलेल्या केकटीन मध्ये आधी पांढरे मिश्रण ओता, त्यावर चमच्याने गुलाबी रंगाचे मिश्रण घाला. मग कोको पावडरमिश्रीत मिश्रण घाला. 
 8. त्यानंतर सुरी मिश्रणावर फिरवा.
 9. तयार केकटीन प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्रीवर ३०-३५ मिनिटे भाजायला (बेक) करायला ठेवा. केक तयार झाला की कुलिंग रॅकवर काढून ठेवावा.
 10. केक पूर्ण थंड झाला की वरचा खडबडीत भाग सुरीच्या मदतीने कापून काढा व केकेचे स्लाईस करा व त्यावर थोडे डेसीकेटेड कोकोनट भुरभुरा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर