Photo of Peanuts Sundal by Shraddha Juwatkar at BetterButter
361
1
0.0(0)
0

सुंदल

Aug-29-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुंदल कृती बद्दल

सुंदल दक्षिण भारतात नवरात्रीत बनवतात. सुंदल काबुली चणे किंवा लाल चणे वापरून बनवतात. भुईमुगाच्या शेंगा भाजून किंवा उकडून खाण्यास अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असतात. म्हणून मी शेंगाचे सुंदल बनवून बघितले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • प्रेशर कूक
  • सॅलड

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 वाट्या उकडलेले भुईमूगाच्या शेंगा
  2. फोडणी साठी तूप, मोहरी, हिंग, जिरे,कढीपत्ता
  3. थोडी हळद व लाल तिखट
  4. 2 टेबलस्पून खोवलेला नारळ
  5. चवीनुसार मीठ व आवडत असल्यास लिंबाचा रस
  6. कोथिंबीर बारीक चिरलेली

सूचना

  1. प्रथम शेंगा 3/4 वेळा पाण्यातून धूवून कुकर मध्ये 4 शिट्ट्या करून घेणे . शिजवताना थोडे मीठ घालावे.
  2. कढईत तूप गरम करून त्यात मोहरी जिरे कढीपत्ता आणि हिंग घालावे.नंतर हळद व लाल तिखट घालून ओले खोबरे घालून व्यवस्थित परतून घ्यावे व उकडलेल्या शेंगा घालून हलक्या हाताने ढवळून पाच मिनिटे झाकून वाफ काढावी.
  3. खाली उतरून त्यात आवडीनुसार लिंबाचा रस व कोथिंबीर घालून खाण्यास दयावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर