मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीचे मोदक

Photo of Steamed modak by Teju Auti at BetterButter
1132
3
0.0(0)
0

उकडीचे मोदक

Aug-30-2018
Teju Auti
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीचे मोदक कृती बद्दल

Sweet desert

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी तांदुळाचे पीठ
  2. १ वाटी ओल्या नारळाचा कीस
  3. पाव वाटी गुळ
  4. १ वाटी पाणी
  5. मीठ
  6. १/२ छोटा चमचा वेलची पावडर

सूचना

  1. एका नॉनस्टिक भांड्यात सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य घ्यावे. मध्यम आचेवर हे भांडे ठेऊन, गुळ वितळून सारण सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतावे.
  2. एका पातेल्यात १ वाटी पाणी घेऊन, चिमुटभर मीठ घालून मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवावे.पाण्याला उकळी येताच, त्यात तांदुळाचे पीठ घालून, चांगले ढवळावे.हे भांडे आचेवरून उतरून, १० मिनटे झाकून ठेवावे.
  3. १० मिनिटांनी, मोठ्या परातीत ही उकड घेऊन, गरम असतानाच मळून घ्यावी.मळताना आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून, शेवटी थोडे तेल लावून मऊसर गोळा तयार करावा.
  4. मोदकपात्रात लागेल तेवढे पाणी घेऊन ते गरम होण्यास ठेवावे.आता उकडीतून छोटा लिम्बाएवढा गोळा घेऊन, दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने खोलगट पारी करावी.ह्या पारीत, एक मोठा चमचा पुरण घालावे.पुरण घातल्यावर, कडा चिमटीत पकडून मोदकाच्या कळ्या काढाव्यात.
  5. छान मोदकाचा आकार वळावा
  6. चाळणीला थोडा तेलाचा हाथ लावून चाळणी मोदकपात्रात ठेवावे. प्रत्येक मोदक पाण्यात भिजवून नीट लावून ठेवावा. आता मोदकपत्राचे झाकण लावून, १५ मिनटे मोदक उकडून घावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर