मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळाचे दूध आणि तांदळाचे पॅनकेक

Photo of Coconut milk and rice pancake by archana chaudhari at BetterButter
749
1
0.0(0)
0

नारळाचे दूध आणि तांदळाचे पॅनकेक

Aug-30-2018
archana chaudhari
120 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळाचे दूध आणि तांदळाचे पॅनकेक कृती बद्दल

हा एक थायलंड येथील प्रसिद्ध खुपच चविष्ट पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • सोपी
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. नारळाचे दूध ३ कप
  2. आंबेमोहोर तांदूळ ३ टेबलस्पून
  3. कॉर्नफ्लोअर २ टेबलस्पून
  4. साखर ४ टेबलस्पून
  5. मीठ १ टीस्पून
  6. तेल २ टेबलस्पून
  7. कांदापात १ टेबलस्पून(बारीक चिरलेला)

सूचना

  1. तांदूळ धुऊन घ्या आणि २ तास पाण्यात भिजत ठेवा.
  2. दोन तासांनंतर तांदूळ थोडे थोडे पाणी टाकून पेस्ट बनवून घ्या.
  3. एका मोठया भांड्यात तांदूळ पेस्ट,नारळाचे दूध,कॉर्नफ्लोअर, साखर, मीठ आणि ३ कप पाणी टाकून छान एकत्र करा.
  4. मिश्रण पातळसर असायला हवं.
  5. आता अप्पे पॅन गरम करायला ठेवा.
  6. आता पातळसर मिश्रण चमच्याने अप्पे पात्रात टाका.
  7. वरून थोडी कांद्याची पात टाका.
  8. थोडेसे तेल टाकून मध्यम आचेवर झाकून ठेवा.
  9. खालच्या बाजूने सोनेरी रंग झाला की झाकण काढून घ्या.
  10. गरम गरम नारळाच्या दूध आणि तांदळाचे पॅनकेक टूथपीक च्या साहाय्याने सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर