मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला शेंगदाणे

Photo of Spicy Peanuts by Sanika SN at BetterButter
460
1
0.0(0)
0

मसाला शेंगदाणे

Aug-30-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
6 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला शेंगदाणे कृती बद्दल

कमीत कमी वेळात व कमीत कमी तेलात बनणारे चटपटीत प्रकार

रेसपी टैग

  • सोपी
  • नॉर्थ इंडियन
  • मायक्रोवेवींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी शेंगदाणे
  2. १/३ वाटी बेसन
  3. १ टीस्पून लाल तिखट
  4. १/४ टीस्पून हळद
  5. १/२ टीस्पून धणेपूड
  6. १/४ टीस्पून अनारदाना पावडर
  7. १/४ टीस्पून हिंग
  8. १/४ टीस्पून चाट मसाला
  9. मीठ चवीनुसार
  10. २ टेबलस्पून्स तेल
  11. एक मोठी चिमूट खायचा सोडा

सूचना

  1. एका मिक्सिंग बाऊलमध्ये, बेसन, लाल तिखट, हळद, हिंग, धणेपूड, अनारदाना पावडर, चाट मसाला, मीठ, खायचा सोडा एकत्र करून घेणे.
  2. त्यात १ चमचा तेल घालून मिक्स करून घेणे.
  3. शेंगदाणे पाण्यात एकदा भिजवून, निथळून घेणे व ते बेसनाच्या मिश्रणात घालून चांगले मिक्स करून घेणे.
  4. सगळा मसाला नीट शेंगदाण्यांना लागला पाहिजे. उरलेले एक चमचा तेल ही त्यात घालणे व कालवणे.
  5. मायक्रोवेव्ह सेफ प्लेटमध्ये हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घेणे. हाय पॉवर वर ४ मिनिटे शिजवणे. 
  6. हलकेच हलवून पुन्हा एकदा हाय पॉवर वर १ मिनिट ठेवणे.
  7. आता मध्यम पॉवर वर १ मिनिट शिजू द्यावे.
  8. संपूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर