मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा खिचडी
माझी आई अगदी अप्रतिम खिचडी बनवते ( वनस्पती तुपात), आई खिचडी बनवायची तेव्हा सगळीकडे नुसता घमघमाट सुटायचा, नुसत्या वासानेच खूप भूक लागायची. लहानपणी खिचडी साठी आम्ही उपवास करायचो आणि आता नाष्ट्यासाठी म्हणून एखादे दिवशी आवर्जून खिचडी केली जाते. खिचडीसाठी साबुदाणा भिजवण्याची एक सोपी पद्धत आहे, जी चुकून मला समजली. एके दिवशी रात्री साबुदाणा भिजत घालताना माझ्या मुलीने मला हाक मारली म्हणून मी साबुदाण्यात पाणी घालून ती काय म्हणतेय हे पहायला गेले आणि अर्ध्या तासाने लक्षात आले की अरे ! ... साबुदाण्यात पाणी तसेच आहे. मी पटकन गेले आणि साबुदाणा बघितला तर बऱ्यापैकी मऊ झाला होता म्हणून साबुदाण्यातील पाणी काढून टाकले आणि आता कशी होतेय देव जाणे असे मनाशी पुटपुटत त्यावर झाकण ठेवून दिले. सकाळी उठल्यावर प्रथम हात फिरवून साबुदाणा बघितला तर एकदम मऊ आणि मोकळा झाला होता.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा