बफ वडा | Buff vada Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  30th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Buff vada by seema Nadkarni at BetterButter
बफ वडाby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  40

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

बफ वडा recipe

बफ वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Buff vada Recipe in Marathi )

 • तळण्यासाठी तेल
 • 1/2 टी स्पून लाल तिखट
 • 1 चमचा आमचूर पावडर
 • चवी पुरते मीठ
 • 1/2 चमचा साखर
 • 2-3 चमचा आरारूट किंवा कोनफ्लोर
 • 2 चमचा मिरची आणि कोथिंबीर ची चटणी
 • 1/2 वाटी शेंगदाण्याचा कूट
 • 250 ग्राम बटाटे

बफ वडा | How to make Buff vada Recipe in Marathi

 1. सौ प्रथम बटाटे उकडून घ्यावेत.
 2. बटाटे थंड झाल्यावर त्याची साले काढून, हातांनी दाबून कालवून घ्या.
 3. त्यात चवीप्रमाणे मीठ व आरारूट किंवा कोनफ्लोर घालून एकत्र करावे.
 4. शेंगदाणे भाजून त्याची पूड करून घ्यावे. त्यात साखर, मीठ, आमचूर पावडर मिरची आणि कोथिंबीर ची चटणी, लाल तिखट घालून एकत्र मिश्रण तयार करून घ्या.
 5. बटाट्याचे मिश्रणा चे छोटे छोटे गोळे करून घ्या.
 6. ह्या गोळ्या ची पारी तयार करून त्यात वरील सारण भरून गोळे तयार करून घ्या.
 7. तेल तापवून त्यात हे वडे मंद आचेवर तळून घ्यावेत..
 8. हे वडे खजूरा ची चटणी बरोबर खाल्ले जातात..

My Tip:

हे वडे मंद आचेवर एक एक करून तळावे, म्हणजे फुटत नाहीत..

Reviews for Buff vada Recipe in Marathi (0)