मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार पॅटिस

Photo of Green peas patice by SUCHITA WADEKAR at BetterButter
798
2
0.0(0)
0

मटार पॅटिस

Aug-31-2018
SUCHITA WADEKAR
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार पॅटिस कृती बद्दल

मागच्या आठवड्यात सगळीकडे बंदमुळे शाळा, कॉलेजेस बंद होते त्यामुळे सगळे घरी होते आणि सर्वांनाच वेगळे काहीतरी हवे होते म्हणून मग हॉटेल 'तपस्या' फेम मटार पॅटिस बनवायचे ठरवले. तापस्याचे हे पॅटिस खूप छान असतात त्यामुळे एकदा घरी ट्राय केला आणि जमले, तेव्हापासून बऱ्याचदा केले जाते. बनवायला अगदी सोपे आहेत आणि टेस्टीही लागतात. मुलांना आणि मोठ्यांनाही खूप आवडतात त्यामुळे लगेच फस्तही होतात. या पॅटिस मध्ये तुम्ही मटार, कॉन, पनीर क्युब, चीझ क्युब घालून वेगवेगळे पॅटिस बनवू शकता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ● बटाटे अर्धा किलो
  2. ● मटार 1 वाटी
  3. ● हिरवी मिरची 2-3
  4. ● लसूण ४ पाकळ्या
  5. ● आले अर्धा चमचा
  6. ● कोथिंबीर
  7. ● ब्रेड क्रम्ससाठी लागणारे टोस्ट 5-6
  8. ● पेस्टसाठी लागणारा कॉनफ्लॉवर 4 चमचे

सूचना

  1. 1. बटाटे उकडून किसणीवर किसून घ्यावेत.
  2. 2. लसूण, आलं, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबिरीचे वाटण करावे.
  3. 3. एका कढईत थोड्याशा तेलावर वाटण परतावे. (आवडत असेल तर हिंग, हळद घालावे)
  4. 4. किसलेला बटाटा घालून एकजीव करावे.
  5. 5. सारण थोडे सैल वाटल्यास यात थोडे ब्रेडक्रम्स (टोस्ट मिक्सरला बारीक करून घेणे) घालावेत.
  6. 6. या सारणाचे गोळे करून त्यामध्ये मटार (कच्चा मटार) भरून गोळे बंद करावेत.
  7. 7. तयार केलेले गोळे कॉनफ्लॉवरच्या पेस्ट मधून काढून ब्रेडक्रम्समध्ये घोळवावेत.
  8. 8. आणि गरम तेलात पॅटिस तळून घ्यावेत.
  9. 9. सजावटी साठी टोमॅटोसॉस आणि त्यावर शेव भुरभूरून सर्व्ह करावे "मटार पॅटिस".

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर