मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा कतली

Photo of SHENGDANA KATLI by Aditi Bhave at BetterButter
803
5
0.0(0)
0

शेंगदाणा कतली

Sep-01-2018
Aditi Bhave
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा कतली कृती बद्दल

कमीतकमी साहित्य वापरून केलेली शेंगदाणा कतली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • अकंपनीमेंट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 6

  1. शेंगदाणे-1 वाटी
  2. साखर - पाऊण वाटी
  3. तूप- 1 चमचा
  4. पाणी - अर्धी वाटी
  5. वेलची पावडर - अर्धा चमचा
  6. चांदीचा वर्ख

सूचना

  1. प्रथम शेंगदाणे भाजून घ्यावे. साल काढून घ्यावीत.
  2. शेंगदाण्याचे बारीक कूट करावे.
  3. कढईत पाणी व साखर एकत्र करून बारीक गॅस वर ढवळत रहावे.
  4. असे बुडबुडे येतील.
  5. ढवळत राहावे.
  6. एकतारी पाक होत आल्यावर एक चमचा साजुक तूप घालावे.
  7. तूप मिक्स करावे.
  8. भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालून ढवळावे.
  9. गोळा होत आला की त्यात वेलची पावडर घालावी.
  10. तूप लावलेल्या ताटात हे मिश्रण ओतावे. व थापून घ्यावे.
  11. वर्ख लावून छान वड्या कापाव्यात
  12. वड्या तयार.
  13. अशी ही सोपी पटकन होणारी काजू कतलीची बहीण शेंगदाणा कतली तयार. 70% काजू कतलीच्या जवळपास चव लागते.:blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर